PM Narendra Modi : नेहरूंनंतर इंदिरा गांधी, वाजपेयींनी ‘हे’ करून दाखवलं! मोदींचा दावा काँग्रेसनं खोडून काढला

Lok Sabha Election Result PM Narendra Modi Jairam Ramesh Congress Jawaharlal Nehru : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
Narendra Modi, Indira Gandhi, Atal Bihari Vajpayee
Narendra Modi, Indira Gandhi, Atal Bihari VajpayeeSarkarnama

New Delhi : लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर हा इतिहास घडवणारे ते पहिले पंतप्रधान असतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे. पण काँग्रेसने हा दावा खोडून काढला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधींचा हवाला देत मोदींवर पलटवार केला आहे. नेहरूंनंतर वाजपेयींनी तीनदा तर इंदिरा गांधींनी चारवेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदींसाठी ढोल बडवणारे त्यांची नैतिक, राजकीय आणि व्यक्तिगत पराभवात आशेचा किरण शोधत आहेत. नेहरुंनंतर मोदी सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळवणारे पहिले व्यक्ती असल्याचा खूप प्रचार केला जात आहे.

एखाद्या पक्षाला 240 जागा मिळणे आणि एक-तृतियांश पंतप्रधान बनने जनादेश कसा असेल, हे सांगितले जात नाही. नेहरूंना 1952 मध्ये 364, 1957 मध्ये 371 आणि 1962 मध्ये 363 जागा मिळाल्या होत्या. प्रत्येकवेळी दोन तृतियांश बहुमत होते. त्यानंतरही त्यांनी लोकशाहीवादी राहून संसदेची प्रतिष्ठा वाढवली, असे जयराम रमेश यांनी सांगितले.

Narendra Modi, Indira Gandhi, Atal Bihari Vajpayee
Chandrababu Naidu : चंद्राबाबूंच्या पत्नीच्या संपत्तीत पाच दिवसांत तब्बल 535 कोटींनी वाढ, मुलगाही मालामाल

नेहरूंनंतर सलग असो किंवा नसो पण अटल बिहारी वाजपेयी यांनी 1996, 1998 आणि 1999 अशी तीनदा शपथ घेतली आहे. इंदिरा गांधींनी 1966, 1967, 1971 आणि 1980 मध्ये चारवेळा पंतपधानपदाची शपथ घेतली. एक तृतियांश पंतप्रधानांसाठी ढोल बडवणारे 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीला चांगले सिध्द करण्यासाठी काहीही शोधून काढतील, असा टोला जयराम रमेश यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com