Lok Sabha Election Result PM Narendra Modi : मोदी हरले, ‘इंडिया’ जिंकली! वाराणसीतही मोठा झटका

Varanasi Constituency PM Narendra Modi Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर एनडीएने प्रचार केला होता. पण हा प्रचार मतदारांना भावला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

PM Narendra Modi News : मोदी...मोदी...मोदी... काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भाजपसह मित्रपक्षांच्या नेत्यांच्या तोंडी चोवीस तास हाच गजर होता. उमेदवार कुणीही, कसाही असला तरी मोदींच्या करिष्मावर त्याचं सोनं होईल, या भरवशावर राहिलेल्या भाजपला निवडणुकीत झटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाराणसी मतदारसंघातही मताधिक्य राखता आलेलं नाही. त्यामुळे या निवडणुकीत मोदींचा नैतिक पराभव झाल्याची हिंमत विरोधक करू लागले आहेत.  

लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून भाजप स्वबळावर बहुमताचा जादुई आकडा गाठू शकलं नाही. त्यामुळे मित्रपक्षांचे महत्व पुन्हा वाढले आहे. मागील दोन निवडणुकीत भाजपने स्वबळावरच सत्ता काबीज केल्याने मित्रांचे महत्व कमी झाले होते. पण या निवडणुकीने भाजपला चांगली अद्दल घडवल्याचे बोलले जात आहे.

भाजपने प्रचारामध्ये केवळ नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे केला होता. पण उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये त्याचा प्रभाव पडला नाही. मोदींच्या करिष्म्याला ओहोटी लागल्याचे स्पष्ट झाले आहे. अयोध्यो राम मंदिराचा मुद्दाही या निवडणुकीचा काहीच चालला नाही. अयोध्येतच भाजपचा पराभव झाला. उत्तर प्रदेशात भाजपचा धुव्वा उडाला आहे.

PM Narendra Modi
Lok Sabha Election 2024 Result Congress Vs BJP : काँग्रेसची स्ट्रॅटेजी अन् खर्गेंचे नवे मित्र कोण? उद्या फैसला

वाराणसीतही मताधिक्य नाही

वाराणसी लोकसभा मतदारसंघातही पंतप्रधान मोदींचा करिष्मा चालला नाही. या मतदारसंघात मोदींचा केवळ दीड लाख मतांनी विजय झाला आहे. मागील दोन्ही निवडणुकांच्या तुलनेत हे मताधिक्य कमालीचे घटले आहे.

2014 च्या निवडणुकीत मोदींनी अरविंद केजरीवाल यांचा तब्बल 4 लाख 79 हजार मतांनी पराभव केला होता. 2019 मध्येही मोदींचे मताधिक्य 3 लाख 72 हजारांपर्यंत खाली आहे. 2024 च्या निवडणुकीत या मताधिक्यात तब्बल पावणे दोन लाख मतांनी घट झाली आहे.

काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी मोदींना जोरदार टक्कर दिली. मोदींना एकूण 6 लाख 12 हजार मते मिळाली. तर राय यांनीही मोदींच्या बालेकिल्यात मुसंडी मारत 4 लाख 60 हजारांहून अधिक मते मिळवली आहेत. मागील निवडणुकीतही राय हेच काँग्रेसचे उमेदवार होते.

वाराणसीत कमी झालेले मताधिक्य आणि उत्तर भारतात घटलेल्या जागांमुळे काँग्रेससह इतर विरोधी पक्षातील नेत्यांनीही मोदींनी राजीनामा द्यायला हवा, अशी टोकाची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com