Lok Sabha Election Update Share Market Down : निकाल फिरू लागताच डी-स्ट्रीटवर मोठी उलथापालथ; शेअर बाजार 3 हजार अंकांनी कोसळला

Lok Sabha Election 2024 Results Dalal Street Share Market Live Update : लोकसभा निवडणुकीचे कल हाती येऊ लागताच शेअर बाजारात मागील काही दिवसांतील मोठी घसरण झाली आहे.
Share Market, Narendra Modi
Share Market, Narendra ModiSarkarnama

Sensex Crash Latest Update : लोकसभा निवडणुकीचे सुरूवातीचे कल हाती येऊ लागताच शेअर बाजार क्रॅश झाला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे संकेत मिळत असले तरी मिळणाऱ्या अपेक्षेपेक्षा खूप कमी येत असल्याने शेअर बाजारात 3 हजारांहून अधिक अंकांची घसरण झाली.

एक्झिट पोलमध्ये भाजपला 360 हून जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे सोमवारी शेअर बाजारात चांगली वाढ झाली होती. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात बाजाराने उसळी घेतली. पण सकाळी 1 वाजेपर्यंत अपेक्षित कल नसल्याने बाजार कोसळला आहे.

सकाळी अकरा वाजता मुंबई शेअर बाजारात 3132.12 अंकांनी घसरला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीमध्ये सुमारे तीन टक्क्यांची घसरण झाली होती. सोमवारी शेअर बाजारात तीन टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र, मंगळवारी गुंतवणुकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

Share Market, Narendra Modi
Lok Sabha Election Result Live : राहुल गांधींना दोन्ही मतदारसंघात मोठी आघाडी; स्मृती इराणी पिछाडीवर

दरम्यान, एनडीएने 400 पारचा नारा दिल्यानंतर एक्झिट पोलनेही भाजपच्या बाजूने कल दिला. त्यामुळे एनडीएचा आकडा 400 पर्यंत जाण्याचा अंदाज होता. पण अंदाज सपशेल फोल ठरला आहे. एनडीएच्या जागा 300 पारही जाताना दिसत नाही. जादुई आकडा 272 च्या पुढे भाजप गेले असले तरी अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com