Lok Sabha Electon 2024: PM मोंदीना प्रचारासाठी 96 तासांची बंदी? 'या' गटांची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी

Lok Sabha Electon 2024: सूरत, इंदूर, गांधीनगर आणि इतर ठिकाणी उमेदवारांना माघार घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. पण त्यांना माघार घेण्यासाठी दबावही टाकला जात आहे, याची चौकशी करण्याचे आदेश द्या.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

PM Narendra Modi Speech Ban: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना 96 तासांसाठी प्रचारावर बंदी घालावी अशी मागणी करणारं पत्रं सिव्हिल सोसायटी गटांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. या पत्रात राजकीय पक्षांविरुद्ध निःपक्षपाती कारवाई करण्यात आलेले अपयश असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तर या पत्राद्वारे नेमकी काय मागणी करण्यात आली आहे. ते जाणून घेऊया.

सध्या देशभरात सुरू असलेल्या लोकसभा (Lok Sabha) निवडणुकांदरम्यान, सिव्हिल सोसायटी ग्रप्सनं भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी देशातील सार्वत्रिक निवडणुकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पत्रात मतदानाचा डेटा एकाचवेळी अंतिम स्वरुपात जाहीर केला जात नसल्याची तक्रारदेखील करण्यात आली आहे. शिवाय सध्याच्या निवडणुकांबद्दल चिंता व्यक्त करतानाच या गटांनी 2019 मधील निवडणुकांच्या मतदानाच्या डेटामधील तफावतीवर शंका उपस्थित केल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणकीच्या डेटावर शंका उपस्थित करतच या गटांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या प्रचारावर 96 तासांसाठी बंदी घालण्यात यावी अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता आयोग (Election Commission) यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात, निवडणुकीदरम्यान द्वेषयुक्त भाषणांवर नियंत्रण आणण्यात अपयश आलं आहे. सरोगेट जाहिरातींवर कारवाई करण्यात अपयश, राजकीय पक्षांविरुद्ध निःपक्षपाती कारवाई करण्यात आलेले अपयश, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

पत्राद्वारे केल्या 'या' मागण्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींना 96 तास प्रचार करण्यास बंदी घाला. सूरत, इंदूर, गांधीनगर आणि इतर ठिकाणी उमेदवारांना माघार घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. पण त्यांना माघार घेण्यासाठी दबावही टाकला जात आहे, याची चौकशी करण्याचे आदेश द्या.

PM Narendra Modi
Girish Mahajan :'उन्मेष पाटलांना संकट काय आहे हे कळेल', गिरीश महाजनांचा गर्भित इशारा

सन 2019 मधील लोकसभेचं मतदान आणि मोजणी झालेल्या मतांमधील तफावतीचं स्पष्टीकरण द्या. निवडणूक आयोगानं तातडीनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आत्तापर्यंत तिन्ही टप्प्यांमध्ये झालेल्या मतांची संख्या जाहीर करावी. आचारसंहितेचं उल्लंघन केलेल्या सर्व पक्षांवर कारवाई केल्याची खात्री करावी. राजकीय पक्षांकडून करण्यात येणाऱ्या सरोगेट जाहिरातींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा मागण्या पत्राद्वारे आयोगाकडे केल्या आहेत.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com