Lok Sabha Pro-Tem Speaker : मोदींनी पहिला पंगा घेतला! काँग्रेस संसदेत देणार टक्कर

BJP leader Bhartruhari Mahtab Lok Sabha Pro-Tem Speaker Congress : अठराव्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Rahul Gandhi, PM Narendra Modi
Rahul Gandhi, PM Narendra ModiSarkarnama

New Delhi : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. मागील दोन टर्ममध्ये विरोधकांची ताकद कमी पडत होती. पण यावेळी काँग्रेसने मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास दुप्पट जागा मिळवल्या आहेत.

वाढलेल्या खासदारांमुळे काँग्रेस नेत्यांमध्येही जणूही शंभर हत्तींचे बळ संचारले आहे. लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीदरम्यान ही ताकद दाखवून देण्याची तयारी काँग्रेसने केल्याचे दिसते. हंगामी अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर मोदींनी पहिल्याच दिवशी पंगा घेतल्याचे सांगत काँग्रेस नेत्यांनी त्यांना इशारा दिला आहे.

लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदींनी हंगामी अध्यक्ष नियुक्तीची परंपरा मोडित काढल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट! आयोगानं कंबर कसली...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले, लोकसभेत सर्वाधिक काळ खासदार असलेल्या सदस्याची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा संकेत आणि परंपरा आहे. त्यानुसार काँग्रेसचे के. सुरेश आणि भाजपचे वीरेंद्र कुमार हे यावेळी आठव्यांदा खासदार झाले आहेत. महताब यांची ही सातवी टर्म आहे.

वीरेंद्र कुमार हे सध्या मंत्री आहेत. त्यामुळे के. सुरेश हेच हंगामी अध्यक्ष होतील, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. पण सरकारने ही परंपरा खंडित केली. बुलडोझर राजकारणाच्या मानसिकेतून ते बाहेर आलेले नाहीत. के. सुरेश हे दलित असून मोदी दलितविरोधी आहेत. महताब यांच्या नियुक्तीने संविधानाचाही अवमान झाल्याची टीका जयराम रमेश यांनी केली.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट! आयोगानं कंबर कसली...

सरकारने पहिल्याच दिवशी पंगा घेतला आहे. पण आम्हीही त्याला कडाडून विरोध करू. पंतप्रधान मोदी श्री 400 नाहीत तर श्री 240 आहेत. त्यांचे एक तृतियांश बहुमताचे सरकार आहे. निवडणुकीत त्यांचा नैतिक पराभव झाला आहे, असा निशाणा जयराम रमेश यांनी साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com