Nitish Kumar and Tejashwi Yadav On Same Flight : नितीश कुमार अन् तेजस्वी यादव करणार खेळ? दिल्लीचं राजकारण हादरणार...

Bihar Lok Sabha Election Result : बिहामधील लोकसभा निवडणुकीत 40 मधील 30 जागांवर 'एनएडीए'ला विजय मिळाला आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्याकडे 'एनडीए' आणि 'इंडिया' आघाडीच्या नजरा लागल्या आहेत.
Nitish Kumar | Tejashwi Yadav
Nitish Kumar | Tejashwi Yadav sarkarnama

Delhi News, 5 June : प्रचाराच्या रणधुमाळीत अवघा भारत पिंजून काढताना 'चारसौ पार'साठी धावाधाव करणाऱ्या मोदी-शहांना महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश बिहार, तमिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये ही जोडगोळी जमिनीवर आले. थोडक्यात मतदारांनी आणले असेच. दुसरीकडे, भाजपकडे 'मॅजिक फिगर' नसल्याने 'एनडीए'तील काही मित्रांना आनंदच आनंद वाटत असल्याचे बोलले जात आहे.

भाजपला ( Bjp ) नाही; पण 'एनडीए'ला बहुमत असल्याने तूर्त 'बॅकफूट'वर असलेली 'इंडिया' आघाडी सत्तेसाठी कुठच्या क्षणी उचल खाऊ शकते; म्हणजे, 'एनडीए'तील काही ताकदवान मित्रपक्षांना फोडले जाऊ शकते. विशेषतः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार ( Nitish Kumar ), आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू ( Chandrababu Naidu ) यांना गळाला लावण्याचे प्रयत्न होऊ शकतो.

अशातच नितीशकुमार आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव ( Tejashwi Yadav) हे बुधवारीच सकाळीचे तेही एकाच फ्लाइटने दिल्लीत 'लॅण्ड' झाले आहेत. हे दोघेही एकत्र दिल्लीकडे गेल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

पण, नितीश कुमार 'एनडीए'च्या बैठकीत सामील होतील. दुसरीकडे तेजस्वी यादव 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला सहभागी होणार आहेत.

Nitish Kumar | Tejashwi Yadav
PM Modi : 'तिसऱ्या कार्यकाळात देश एक नवा अध्याय लिहीन ही मोदींची गॅरंटी'

बिहारमध्ये कोणाला किती जागा?

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये 40 मधील 30 जागांवर 'एनडीए'ला यश मिळालं आहे. नितीश कुमार यांच्या जनता दल ( यूनायटेड ) अर्थात जेडीयूला 12 आणि भाजपला 12 जागा मिळाल्या आहेत. लोकजनशक्ति पार्टीला ( रामविलास ) 5 आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाला ( एस ) एक जागा मिळाली आहे. तर, लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला ( आरजेडी ) चार जागा मिळाल्या आहेत. तर, काँग्रेसला 3 आणि कम्युनिस्ट पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत. पूर्णिया येथील एक जागा अपक्ष पप्पू यादव यांच्या खात्यात गेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com