Babajani Durrani News : अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना सरकारचे 'अभय'

Parbhani DCC Bank Directorship : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद रद्दबातल केल्याच्या निर्णयाला सहकारमंत्र्यांची स्थगिती
Babajani Durrani
Babajani DurraniSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : राजकीय अपरिहार्यतेतून राष्ट्र्वादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटात सहभागी झालेले विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकपद रद्द करण्यात आले होते. मात्र, आमदार दुर्राणी यांनी या निर्णयाविरोधात तातडीने सहकारमंत्र्यांकडे धाव घेतली. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विभागीय सहनिबंधकांच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे. (Babajani Durrani, MLA of Ajit Pawar's group, is protected by government)

आमदार बाबाजानी दुर्राणी प्रतिनिधित्व करत असलेल्या संस्थेकडे थकबाकी असल्यामुळे त्यांचे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकपद रद्दबातल करण्यात यावे, अशी तक्रार राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे नेते स्वराजसिंह परिहार यांनी केली होती. यासंदर्भात चौकशी करून विभागीय सहनिबंधक, छत्रपती संभाजीनगर यांनी दुर्राणी यांचे संचालकपद रद्दबातल ठरवले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Babajani Durrani
Santosh Danve Birthday : शब्दाला जागणारा नेता अन् 28व्या वर्षी आमदारकी...

या निर्णयाविरोधात दुर्राणी यांनी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर सुनावणी घेत दिलीप वळसे पाटील यांनी संचालकपद रद्द करण्याच्या विभागीय सहनिबंधक यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

वरपूडकर न्यायालयात; तर दुर्राणी सहकारमंत्र्यांकडे

बँकेचे अध्यक्ष तथा कॉंग्रेसचे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपूडकर यांच्याबाबतीत अशाच पद्धतीने तक्रार करण्यात आली होती. तक्रारीवरून त्यांचेही संचालकपद रद्दबातल ठरवण्यात आले होते. त्यामुळे वरपूडकर यांच्या अध्यक्षपदावरही गंडातर आले. मात्र वरपूडकर यांनी तत्काळ न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाने त्यांना तात्पुरता अभय दिला.

Babajani Durrani
Assembly Winter Session : भुजबळ, वडेट्टीवार, जरांगेंनी महाराष्ट्र एकसंध ठेवावा; आमदार लांडगेंची कळकळीची विनंती

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडाळी झाल्यानंतर परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र सत्ताविरोधी गटात असल्यामुळे त्यांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. राजकीय सहभागातील अनेक वर्षांचे साथीदार शिंदे गटात गेल्याने अडचणी निर्माण झाल्या. तसेच, शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी कडवे आव्हान उभे केले.

स्थानिक भाजप नेत्यांनी केलेल्या तक्रारीमुळे चौकशीचा ससेमिरा मागे लागला. अखेर दुर्राणी अजित पवार गटात सामील झाले. मात्र, परिहार यांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे विभागीय सहनिबंधक यांनी संचालक पद रद्दबातल करण्याचा आदेश दिला. सत्ताधारी गटात सहभागी होऊनही रद्दबातल होण्याची कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र, सहकारमंत्री वळसे पाटील यांनी अभय दिल्यामुळे दुर्राणी यांना पहिल्यांदाच राजकीय लाभ मिळाल्याचे बोलले जात आहे.

Babajani Durrani
Winter Session 2023 : सभागृहाची इच्छा असेल तर बीड जाळपोळप्रकरणी दोन दिवसांत एसआयटी; फडणवीसांची घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com