Lok Sabha Session : ‘बंगालचे मॉडेल…’ हे शब्द ऐकताच अमित शाह खदखदून हसले! उत्तराने लोकसभेत हशा...    

Amit Shah Saugat Ray Leftist Extremism : माओवादावर चर्चेदरम्यान पश्चिम बंगालमधील खासदार सौगत राय यांनी अप्रत्यक्षपणे ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले होते.
Amit Shah in Lok Sabha
Amit Shah in Lok SabhaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभेत मंगळवारी माओवादावर चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही उपस्थित होते. बहुतेक प्रश्नांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय उत्तर देत होते. पण एक प्रश्न ऐकून शहांना राहवले नाही अन् त्यांच्या उत्तराने लोकसभेत खासदारांना हसू आवरले नाही.  

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी पश्चिम बंगाल नक्षलवादमुक्त झाल्याचे सांगताना अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले. ते म्हणाले, मागील 10-15 वर्षांत नक्षलवाद्यांची समस्या काही राज्यांमध्ये वाढली आहे. सर्वाधिक धोका छत्तीसगड त्यानंतर महाराष्ट्रातील गडचिरोली, ओडिशा आणि आंद्र प्रदेशातही ही समस्या आहे.

Amit Shah in Lok Sabha
Bangladesh Crisis : बांगलादेशवर करडी नजर, पण भारतीयांना लगेच परत आणणार नाही! सरकारकडून स्पष्टीकरण

अजूनही माओवाद्यांसोबत सुरक्षादलाची चकमक झाल्याच्या घटना घडत आहेत. पश्चिम बंगालमध्येही नक्षलवादाची समस्या मोठी होती. पण तिथे ममता बॅनर्जींच्या सरकारने विकासाचे जे काम केले, आदिवासी लोकांना नोकरी दिली, त्यानंतर तेथील नक्षलवाद बंद झाला आहे, असे राय म्हणाले.

परराष्ट्र मंत्री आणि गृहमंत्री पश्चिम बंगालचा अभ्यास करून हे मॉडेल छत्तीसगडसह इतर राज्यांत राबवणार का, असा सवाल राय यांनी केला. हे लोक नक्षलवादावर नियंत्रण ठेवत नसल्याचेही ते म्हणाले. त्यावर तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले.

Amit Shah in Lok Sabha
Supreme Court : आमदार अपात्रता सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी अजितदादांच्या वकिलांना चांगलंच सुनावलं; न्यायालयात नेमकं काय घडलं?

राय यांनी पश्चिम बंगालच्या मॉडेलचा उल्लेख करताच अमित शाह यांना हसू आवरले नाही. त्यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दिशेने हात दाखवत आपण उत्तर देऊ असे सुचित केले. कोणतेही राज्य चांगले काम करत असेल तर त्याचे चांगले उदाहरण म्हणून संपूर्ण देशात लागू करण्यात नरेंद्र मोदी सरकारला काहीच अडचण नाही, अशी सुरूवात शाह यांनी केली.

शाह यांनी पुढे बंगाल सरकारचीच फिरकी घेतली. पश्चिम बंगालचे मॉडेल आपल्याकडे लागू करायला हवे, असे देशातील कोणत्याही राज्याला वाटणार नाही, अशा शब्दांत शाह यांनी अप्रत्यक्षपणे ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी सभागृहामध्ये सत्ताधारी सदस्यांमध्ये चांगलाच हशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com