Video Akhilesh Yadav : अखिलेश यादवांचे ओम बिर्लांना चिमटे; म्हणाले, तुमच्या इशाऱ्यावर संसद चालावी, याचे...

Video Akhilesh Yadav : अखिलेश यादवांचे ओम बिर्लांना चिमटे; म्हणाले, तुमच्या इशाऱ्यावर संसद चालावी, याचे...

Om Birla New Speaker : अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानतंर पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं.
Published on

लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. ते सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. 'एनडीए'तील सगळ्याच घटक पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. आवाजी मतदानानं ओम बिर्ला यांची निवड झाली.

अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानतंर पंतप्रधान मोदी ( Narendra Modi ), विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ), संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ओम बिर्ला ( Om Birla ) यांचं अभिनंदन केलं. यावेळी अखिलेश यादव यांनी ओम बिर्ला यांना खोचक टोले लगावले आहेत. यावेळी ओम बिर्ला फक्त हसत होते.

अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) म्हणाले, "दुसऱ्यांदा तुमची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अध्यक्ष म्हणून पाच वर्षांचा अनुभव तुमच्याजवळ आहे. त्यासह जुन्या आणि नवीन संसदेचाही तुम्हाला अनुभव आहे. मी आणि माझ्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा देतो."

Video Akhilesh Yadav : अखिलेश यादवांचे ओम बिर्लांना चिमटे; म्हणाले, तुमच्या इशाऱ्यावर संसद चालावी, याचे...
Om Birla : पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्लांनी सदस्यांना खडसावले, 'पुढील पाच वर्ष मला...'

"ज्या अध्यक्ष पदावर तुम्ही बसला आहात, त्याच्याशी अनेक गौरवाशाली परंपरा जोडल्या आहेत. कुठलाही भेदभाव न करता आपण पुढे जात लोकसभेचा अध्यक्ष म्हणून तुम्ही प्रत्येक खासदार आणि पक्षाला समान संधी द्याल. निष्पक्षता ही अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. आपण लोकशाहीच्या सरन्यायाधीशपदी बसला आहात. कुठल्याही सदस्याचा आवाज दाबला जाणार नाही आणि त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करून लोकसभेच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल, असं कुठलंही कृत्य तुमच्याकडून होणार नाही," असा चिमटा अखिलेश यादव यांनी ओम बिर्ला यांना काढला आहे.

Video Akhilesh Yadav : अखिलेश यादवांचे ओम बिर्लांना चिमटे; म्हणाले, तुमच्या इशाऱ्यावर संसद चालावी, याचे...
Rahul Gandhi : विरोधी पक्षनेतेपद मिळताच अंदाजही बदलला; 'टी-शर्ट'मधील राहुल गांधी संसदेत...

"तुमचे नियंत्रण विरोधकांवर असतेच. पण, ते सत्ताधिकाऱ्यांवर सुद्धा असावे. तुमच्या इशाऱ्यावर संसद चालावी. याचे उलटे होऊ नये. आपण जेवढा सत्ताधिकाऱ्यांचा सन्मान करता, तेवढा विरोधकांचाही कराल," अशी अपेक्षा अखिलेश यादव यांनी ओम बिर्ला यांच्याकडे व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com