New dehli news : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या सहा खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विलीनीकरणावर शनिवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातून शिवसेनेत गेलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार संजय दिना पाटील, खासदार संजय उर्फ बंडू जाधव, खासदार संजय देशमुख, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासंदर्भातील याचिकेवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला निर्णय घेतला आहे. त्यांनी या सहा खासदाराच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेची साथ सोडत या सहा खासदारांनी 17 जूनला लोकसभा अध्यक्षांची भेट घेत त्यांना शिंदे गटात विलीन होत असल्यास पत्र दिलं होतं. मात्र या विलीनीकरणाला मान्यता देऊ नये, आमच्या पक्षाने कोणामध्येही विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नाही. आमचा पक्ष स्वतंत्र आहे, अशा आशयाचे पत्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आणि लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले होते. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. त्यांनी या सहा खासदाराच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे.
लोकसभा सचिवालयाने नेमका काय दिला निर्णय
लोकसभा सचिवालयाने बंडखोर सहा खासदारांच्या वेगळ्या गटाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलिनीकरणास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता बंडखोर सहा खासदार हे आता शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचाच भाग असतील. शिवसेनेचे लोकसभेतील बळदेखील वाढले आहे. या बंडखोरीनंतर आता विलिनीकरणाचे अधिकृत परिपत्रक लोकसभा सचिवालयाने काढले आहे.
या निर्णयाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. काहीही झालं तरी आम्ही सोडणार नाही. पुढचा कायदेशीर लढा आम्ही लढू असे ठाकरे यांचे आमदार अंबादास दानवे म्हणाले आहेत. त्यासोबतच त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "ज्या लोकांनी या खासदारांना निवडून दिले आहे त्यांची कामं होणं महत्त्वाची आहेत. आमच्याकडे आलेल्या सहा खासदारांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना मोठा विकासनिधी दिला जाईल."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.