West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दिवशीच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला!

BJP vs TMC News : जीव वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षकांसह पळतांना दिसून आले; घटनेचा व्हिडिओ व्हायरल
West bangal BJP candidate
West bangal BJP candidateSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान पश्चिम बंगालमधून हिंसक घटनाच्या बातम्या समोर आल्या आहेत. ज्यामध्ये झारग्रामचे भाजप नेत्याच्या ताफ्यावर हल्ला झाल्याच्या घटनेचाही समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार झारग्राम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणत टुडू यांच्या पथकावर हल्ला झाला, ज्यामध्ये त्यांचे काही सुरक्षा रक्षक जखमी झाले, तर भाजप नेत्यास स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळावे लागल्याचे दिसून आले.

भाजपने या हल्ल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या(West Bengal) सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर केला आहे. भाजपने म्हटले की, टीएमसी कार्यकर्त्यांनी टुडू यांच्या ताफ्यावर तेव्हा हल्ला केला जेव्हा टुडू हे पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील गरबेटा भागातील एका मतदान केंद्राचा पाहणी दौरा करत होते. असेही म्हटले जात आहे की, मतदानादरम्यान गरबेटामध्ये मतदारांना धमकवलं जाण्याची तक्रार समोर आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

West bangal BJP candidate
Mallikarjun Kharge : 'I.N.D.I.A'आघाडीचे पंतप्रधान कोण? - मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, 'हा प्रश्न..'

या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आला असून, तो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मोठ्याप्रमाणवर लोक भाजप नेत्यावर आणि त्यांच्या पथकावर व माध्यम प्रतनिधींवर दगडफेक करताना दिसत आहे. जमाव दगडफेक करत असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांनी तत्काळ टुडू यांना तेथून सुरक्षित बाहेर काढले, अन्यथा काहीही घडू शकले असते. या हल्लेखोर जमावाने भाजप(BJP ) नेत्याच्या गाडीच्या काचाही फोडल्या.

आता या घटनेमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरणही चांगलंच तापले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये((TMC)) जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या लोकसभा मतदारसंघात टुडू यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे कालीपद सोरेन आणि सीपीआय(एम)चे सोनामणी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

West bangal BJP candidate
Loksabha Election : अमित शाहांनी पाच टप्प्यातील मतदानानंतर मोदींना मिळालेल्या जागांचा थेट आकडाच सांगितला, म्हणाले...

या घटनेवरून भाजपने केलेल्या आरोपावर तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे की, टुडू यांच्या सुरक्षा रक्षकाने एका महिलेला मारहाण केली, जी महिला मतदान करण्यासाठी रांगेत उभा होती. या घटनेमुळे जमाव संतप्त झाला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com