LPG Cylinder Shortage: नेत्याच्या घरातून 55 सिलिंडर जप्त, मुख्यमंत्र्यांनी दिले कठोर कारवाईचे आदेश

Gas Cylinder Black Marketing News: सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत कारवाई करण्याचे प्रशासनाला कठोर आदेश दिले आहेत.
LPG cylinder rules in Maharashtra
Gas Cylinder Black Marketing News MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

LPG Cylinder Hoarding Exposed: देशातील गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पावलं उचलली जात आहे. सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांचा रागांच्या रांगा लागत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. अशा परिस्थितीत एका नेत्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला असता, त्यांच्याकडे तब्बल 55 गॅस सिलिंडर आढळले आहेत. पोलिसांनी हे सिलिंडर जप्त केले आहेत.

उत्तर प्रदेशातीव हापूड मध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अब्दूल रेहान यांच्या घरातून ही 55 भरलेले आणि अनेक रिकाने सिलिंडर जप्त केले आहेत. प्रशासकीय कारवाईनंतर आरोपी अब्दुल रेहान हे फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

इतक्या मोठा प्रमाणात सिलिंडर सापडणे ही गंभीर बाब असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण समाजवादी पक्षाने अब्दूल रेहान यांच्या आमच्या पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे सांगत या प्रकरणातून हात झटकले आहेत. समाजवादी पक्षासोबत जर आरोपीचे संबंध असल्याचे तपासात आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

LPG cylinder rules in Maharashtra
Pune Flyover: फडणवीसांनी उद्धघाटन केलेल्या 'अजित पवार उड्डाणपुला'च्या कामात मोठी त्रुट? भाजप नगरसेवकाने केला फोटो शेअर

उत्तर प्रदेशात गँस सिलिंडरचा तुटवडा झाला आहे.सिलिंडर वितरण करताना त्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत प्रशासनाला कठोर आदेश दिले आहेत. सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे योगी यांनी म्हटले आहे. राज्यात गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेल यांचा आवश्यक साठा उपलब्ध आहे. नागरिकांना घाबरुन जाऊ नये, असे आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.

LPG cylinder rules in Maharashtra
UPSC Success Story: बाप शेतकरी, पोरगं झालं ‘क्लास वन’ अधिकारी! शिकवणी न लावता असं केलं अभ्यासाचं नियोजन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com