Lt General Upendra Dwivedi : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी होणार नवे लष्करप्रमुख

Lt. Gen. Upendra Dwivedi to be Next Army Chief : मनोज पांडे यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. त्यांच्याजागी उपलष्करप्रमुख द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Upendra Dwivedi
Upendra Dwivedi Sarkaranama

Lt. Gen. Dwivedi will take over from Gen. Manoj Pande on June 30 : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं मंगळवारी रात्री ही नियुक्ती केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडून द्विवेदी 30 जून रोजी पदभार स्वीकारतील.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज पांडे (Manoj Pande) यांना एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हे 30 जून रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर द्विवेदी नवे लष्करप्रमुख बनतील. द्विवेदी हे 30 वे लष्करप्रमुख असतील.

मध्य प्रदेशातील रेवा येथील सैनिक शाळेतून शिक्षण घेतलं आहे. जनरल द्विवेदी यांना 1984 मध्ये 18 जम्मू आणि काश्मीर रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी या युनिटची कमान हाती घेतली. उत्तर आर्मी कमांडर म्हणून आपल्या कार्यकाळात जनरल द्विवेदी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात गतिमान कारवाया केल्या.

Upendra Dwivedi
Farooq Abdullah on Terror Attack : '...तोपर्यंत इथे दहशतवाद्यांचे हल्ले बंद होणार नाहीत' ; फारुख अब्दुल्लाचं विधान!

विवादित सीमाप्रश्न सोडवण्यासाठी चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेत जनरल द्विवेदी यांचा सक्रिय सहभाग राहिला होता. जनरल द्विवेदी यांना अमेरिकेत पाठवण्यात आलं होतं. आर्मी वॉर कॉलेज, कार्लिस्ले यूएसए 2017 मध्ये नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या समकक्ष अभ्यासक्रमात 'डिस्टिंग्विश्ड फेलो' म्हणून जनरल द्विवेदी यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी संरक्षण आणि व्यवस्थापन विषयात एम.फिल. याशिवाय स्ट्रॅटेजिक स्टडीज आणि मिलिटरी सायन्स या दोन पदव्युत्तर पदव्या त्यांना मिळाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com