M. S. Swaminathan Passed Away : हरित क्रांतीचे जनक स्वामिनाथन यांचे निधन; वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

M. S. Swaminathan News : बंगालच्या दुष्काळात भुकेमुळे लाखो लोकांचा मृत्यूचा दाह स्वामिनाथन यांनी पाहिला.
M. S. Swaminathan Passed Away
M. S. Swaminathan Passed AwaySarkarnama
Published on
Updated on

Chennai News : भारतीय कृषी क्षेत्राला स्वावलंबनाच्या दिशेने नेणारे शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांचे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी चेन्नई येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांना हरितक्रांतीचे जनक म्हणूनही ओळखले जाते. देशातील भीषण दुष्काळाच्या वेळी शेतकरी आणि सरकारी धोरणे तसेच इतर शास्त्रज्ञांच्या मदतीने त्यांनी कृषिक्रांती घडवून आणली. त्यांनी आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्राचे संचालक म्हणून काम पाहिले. (Latest Marathi News)

M. S. Swaminathan Passed Away
Dharashiv Politics : उमरग्याचा पॅटर्नच वेगळा; भाजप जिल्हाध्यक्षांच्या सत्काराला कम्युनिस्ट, शिवसैनिक अन् काँग्रेसीही...

स्वामिनाथन यांना 1987 मध्ये पहिला जागतिक पुरस्कार मिळाला. या पुरस्काराच्या निधीतून त्यांनी 1988 मध्ये एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (MSSRF) ची स्थापना केली. ही संस्था ना-नफा तत्त्वावर चालत होती. तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात जन्मलेले, स्वामिनाथन यांना 1960 च्या दशकात भारतातील गहू आणि तांदळाच्या उच्चप्रती बियाण्यांच्या विकासासाठी जागतिक अन्न पुरस्कार विजेते म्हणून नाव देण्यात आले.

स्वामिनाथन यांनी भारतातील कृषी धोरणे निश्चित करण्यासाठी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत काम केले. 1974 मध्ये रोम येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न काँग्रेससह अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदांचे ते अध्यक्ष झाले.

बंगालचा दुष्काळ पाहून कामासाठी प्रेरणा -

1943 च्या बंगालच्या दुष्काळात भुकेमुळे लाखो लोकांचा मृत्यूचा दाह स्वामिनाथन यांनी पाहिला. जगातील भुकेल्या लोकांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, अन्नधान्याच्या वाढीसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले.

M. S. Swaminathan Passed Away
NCP Mumbai President : मुंबईसाठी अजित पवार गटाने आखली रणनीती; समीर भुजबळांवर सोपवली मोठी जबाबदारी

जुन्या महाराजा कॉलेजमधून प्राणीशास्त्रात पदवी प्राप्त केली, जे आता तिरुवनंतपुरम विद्यापीठ महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, प्रथम जागतिक अन्न पुरस्कार, बोरलॉग पुरस्कार आदी अनेक प्रतिष्ठित, नामांकित पुरस्कार मिळाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com