Dharashiv Politics : उमरग्याचा पॅटर्नच वेगळा; भाजप जिल्हाध्यक्षांच्या सत्काराला कम्युनिस्ट, शिवसैनिक अन् काँग्रेसीही...

Santaji Chalukya BJp News : धाराशिव लोकसभेची जागा भाजपला, शिंदे गटाला की राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाला?
Dharashiv Politics
Dharashiv Politics Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Politics : भाजपचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या सत्काराचा आगळावेगळा सोहळा उमरगा येथे झाला. त्यांच्या मित्रपरिवाराने हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. महिनाभरापूर्वी त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र, घरचा सत्कार लांबणीवर पडत गेला. अखेर त्याला काल (ता. २७ सप्टेंबर) सायंकाळी मुहूर्त सापडला. या छोटेखानी सोहळ्याला भाजपसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना (शिंदे गट) काँग्रेसचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता. (Latest Marathi News)

Dharashiv Politics
Pankaja Munde News : 'पंकजा मुंडेच्या नसानसात भाजप, त्या पक्ष सोडणार नाही'

अर्थात हे सर्वच जण चालुक्यांचे मित्रपरिवार. सर्वांनीच त्यांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याचा अर्थ असा नाही की, या नेत्यांनी आपली विचारसरणी बदलली किंवा विचारसरणीशी तडजोड केली. या नेत्यांच्या राजकीय सलोख्याचे, सौहार्दाचे हे आनंददायी आणि आश्वासक असे चित्र होते.

या सोहळ्याला शिवसेनेचे (शिंदे गट) बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अरुण रेणके, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष माधव पवार, काँग्रेसचे माजी पदाधिकारी बाबू स्वामी, मेघराज बरबडे यांच्यासह माजी सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण टोपे, डॉ. दीपक पोफळे, डॉ. कानडे, नितीन होळे आदी उपस्थित होते.

यातील राजकीय सर्वच राजकीय नेते वाचन, शेरोशायरी, काव्य, साहित्य विविध विषयांवरील चर्चेत रमणारे. त्यांच्या नियमित मैफली होत असतात. हा सत्कार सोहळाही त्याच पठडीतला होता. नुकत्याच झालेल्या वाढदिवसाला भावी आमदार म्हणून शुभेच्छांच्या पोस्ट समाजमाध्यमांत फिरलेल्या प्रवीण स्वामी यांनी सूत्रसंचालन केले.

चालुक्य हे मूळचे मुळज (ता. उमरगा) येथील रहिवासी आहेत. त्यांची सासुरवाडी बार्शी (जि. लातूर) हा आहे. हा धागा पकडून जितेंद्र शिंदे यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या विजयासाठी चालुक्य यांनी केलेल्या प्रयत्नांना त्यांनी उजाळा दिला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याचा धाराशिव लोकसभा मतदारसंघात समावेश आहे.

Dharashiv Politics
NCP Mumbai President : मुंबईसाठी अजित पवार गटाने आखली रणनीती; समीर भुजबळांवर सोपवली मोठी जबाबदारी

चालुक्य हे सुरुवातीपासूनच सर्वांत मिळून मिसळून राहतात. राजकीय नेत्यांनाही वैयक्तिक आयुष्यही असते आणि त्यात सर्व राजकीय पक्षांचे, विविध क्षेत्रांतील मित्र असू शकतात. या सोहळ्यामुळे त्याची प्रचीती आली. महायुतीत धाराशिव लोकसभेची जागा भाजपला, शिंदे गटाला की राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाला सुटणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल, मात्र सर्वांनी चालुक्य यांना शुभेच्छा दिल्या.

राजकीय सलोखा, सौहार्दाचे हे अनोखे चित्र होते. तशीही उमरगा तालुक्याला राजकीय सलोख्याची मोठी परंपरा आहे. येथील सर्वच पक्षांचे बहुतांश नेते निवडणुकीनंतर हेवे-दावे विसरून जातात. अपवाद वगळता राजकीय हेवे-दावे होत नाहीत.

निवडणूक झाली की सगळे विसरून आपापल्या कामाला लागायची, अशी येथील राजकीय नेत्यांची ख्याती आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या बातम्या निवडणुकीचा काळ वगळता इतरवेळी नसतात. राजकीय नेत्यांच्या या समंजसपणामुळे उमरगा शहर आणि तालुक्यातील राजकीय परिस्थितीत कधीही तणाव आला नाही. चालुक्य यांच्या या सत्कारामुळे ही परंपरेची तटबंदी अद्यापही मजबूत असल्याची जाणीव उपस्थितांना झाली.

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com