Madhya Pradesh Assembly Election : मतमोजणीला गेलेल्या नेत्यांच्या खिशात खाजेचे औषध अन् अंतर्वस्त्रामध्ये गुटखा...

Madhya Pradesh Assembly Election : मतमोजणीला गेलेल्या नेत्यांच्या खिशात खाजेचे औषध अन् अंतर्वस्त्रामध्ये गुटखा...

Madhya Pradesh Results in Marathi : मध्य प्रदेशमध्ये निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन
Published on

Madhya Pradesh Election : मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आलेले नेते आणि कार्यकर्त्यांची मतमोजणीस्थळी दाखल होण्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान राजकीय नेत्यांच्या खिशात गुटखा, सिगारेट, सुगंधी सुपारी व खाज सुटण्याचे औषध आढळून आले.

निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्रांमधील सुरक्षा लक्षात घेऊन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. ज्या अंतर्गत नेत्यांना अनेक वस्तू सोबत नेण्यास बंदी घालण्यात आली होती. ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे, धूम्रपान आणि गुटख्याचे पाऊच घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली होती. असे असतानाही अनेक नेत्यांनी ते सोबत आणले आणि तपासात पकडले गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Madhya Pradesh Assembly Election : मतमोजणीला गेलेल्या नेत्यांच्या खिशात खाजेचे औषध अन् अंतर्वस्त्रामध्ये गुटखा...
Madhya Pradesh Assembly Election : मध्य प्रदेशात "लाडली बहनाने" "मामांना" तारलं, शिवराज सिंह पुन्हा मुख्यमंत्री ? 

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याची ही घटना अशोकनगरमध्ये उघडकीस आली आहे. मतमोजणीसाठी गेलेल्या अनेक नेत्यांनी मोजे, बुटात आणि काहींनी तर अंतर्वस्त्रामध्ये लपवून सिगारेट गुटखा आणल्याचे आढळले आहे. एका नेत्यांकडे तर चक्क खिशात खाजेचे औषध अाढळे त्यानंतर पोलिसांनी तपासणी करून त्यांना हाकलून दिले.

मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील चंदेरी, अशोकनगर आणि मुंगवली या तीन विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. या ठिकाणी सर्वाधिक अशा घटना आढळून आल्या आहेत.

Madhya Pradesh Assembly Election : मतमोजणीला गेलेल्या नेत्यांच्या खिशात खाजेचे औषध अन् अंतर्वस्त्रामध्ये गुटखा...
Assembly Elections Vote Results 2023: मध्य प्रदेशमध्ये फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या पथ्यावर ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com