MP Election : मध्य प्रदेशात बंपर व्हाेटिंग, अनेक रेकॉर्ड ब्रेक; भाजप सरकारसाठी कोणते संकेत?

MP Election 2023 Voter Turnout over 76 Percent : मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत बंपर व्हाेटिंग झाल्याने भाजपचं सरकार राहणार की जाणार?
MP Election
MP ElectionSarkarnama

Madhya Pradesh Election : मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झालं. मतदानासाठी अनेक ठिकाणी इतक्या लांब रांगा होत्या, की रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी मतदार उभे असल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मध्य प्रदेशात सरासरी ७६ टक्क्यांवर मतदान झालं. आतापर्यंतचे हे रेकॉर्ड ब्रेक मतदान आहे.

MP Election
Congress Vs BJP : मध्य प्रदेशातील भाजप, काँग्रेस चिंतेत; अंतर्गत सर्व्हेमुळे ताण वाढला

मध्य प्रदेशात २०१८ मध्ये ७५.६३ टक्के, तर २०१३ मध्ये ७२.१३ टक्के मतदान झालं होतं. विधानसभेच्या जवळपास ८५ जागांवर या वेळी ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. सिवानी जिल्ह्यात सर्वाधिक ८८.२ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत या रेकॉर्ड ब्रेक मतदानाने राजकीय पक्षांची धडधड वाढवली आहे. रेकॉर्ड ब्रेक मतदानानंतर संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी एकच चर्चा आहे, या विक्रमी मतदानाचे संकेत काय आहेत?

काय आहे मतदानाचा ट्रेंड?

उशिरापर्यंत मतदान म्हणजे ही राज्यातील भाजप सरकार विरोधात जनतेत मोठी लाट आहे. या वेळी जनतेने काँग्रेसच्या बाजूने दणदणीत मतदान केलं आहे. या वेळी काँग्रेस गेल्यावेळेपेक्षा अधिक बळकट सरकार बनवेल, असा दावा मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नितीन दुबे यांनी केला आहे.

मध्य प्रदेश निवडणुकीत प्रत्येक मतदानावेळी २ टक्क्यांनी वाढ होते. याचं मुख्य कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आहे. आणि निवडणूक आयोगाकडून अभियानाद्वारे करण्यात येणारी जागरूकताही आहे, असं म्हणत भाजप प्रवक्ते हितेश वाजपेयी यांनी विक्रमी मतदान ही एक सामान्य बाब असल्याचं म्हटलं आहे.

या निवडणुकीतील ५ महत्त्वाचे मुद्दे

> महिलांनी या निवडणुकीत मोठ्या संख्येत मतदान केलं. गेल्या वेळेच्या तुलनेत यंदा १८ लाखांहून अधिक महिलांनी मतदान केलं आहे. यामुळे ज्या ठिकाणी तिहेरी लढत आहे, अशा ठिकाणी महिलांची मतं निर्णाय ठरणार आहेत. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने लाडली बहन योजना आणली, तर काँग्रसने या योजनेला टक्कर देण्यासाठी नारी शक्ती योजना आणण्याचं आश्वासन दिलं आहे.

> सामान्यपणे कुठल्याही निवडणुकीत मतदान वाढलं, की सत्ताविरोधी लाट असल्याचं बोललं जातं. मतदान वाढलं की सत्ताधारी पक्षाचं नुकसान होतं, असं जाणकारांचं मत आहे, पण सत्ता विरोधी मत मतपेटीपर्यंत पोहोचलं का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

> स्थानिक पातळीवर प्रत्येक जागेची राजकीय समीकरणं वेगवेगळी आहेत. यामुळे त्याच दृष्टिकाेनातून आकलन केलं पाहिजे, असं जाणकारांचं मत आहे. या वेळी विजयाचे मताधिक्य किंवा फरक हा फार कमी असेल, असंही बोललं जात आहे.

> सपा, बसपावरही खूप काही अवलंबून आहे. कारण राज्यात २४ हून अधिक जागांवर बसपाच्या उमेदवारांचं भाजपसमोर मोठं आव्हान आहे, तर १२ हून अधिक जागांवर समाजवादी पक्षाची स्थिती भक्कम आहे. त्यामुळे सपा, बसपाला मतदान अधिक झाल्यास समीकरणं बदलू शकतात.

> नव्या मतदारांचे मत कोणाला? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन मतदार हे बहुतेक करून तरुण आहेत. ते निर्णय घेण्यास सक्षम असल्याने त्यांची मतं ज्या पक्षाला मिळतील, त्या पक्षाचं सरकार येणार हे निश्चित आहे, असं जाणकारांचं मत आहे.

मतदान वाढल्यावर इतर राज्यांत काय झालं?

कर्नाटकात काही महिन्यांपूर्वीच निवडणूक झाली. या निवडणुकीत ७३.१९ टक्के मतदान झालं. हे मतदान २०१८ च्या तुलनेत अधिक होतं. निवडणुकीत विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसला या वाढलेल्या मतदानाचा फायदा झाला आणि काँग्रेसने स्वबळावर सरकार स्थापन केलं. गुजरातमध्ये मतदान कमी झालं. त्याचा फायदा सत्ताधारी भाजपला झाला. गुजरामध्ये ६४.२५ टक्के मतदान झाले. गेल्यावेळच्या तुलनेत ३ टक्क्यांनी हे मतदान कमी होतं.

MP Election
BJP Politics : भाजपमध्ये दलितांना मोठा नेता होण्याची संधी नाहीच; खासदारानेच दिला घरचा आहेर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com