Madhya Pradesh Assembly Election: मध्य प्रदेशात भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच ५७ उमेदवारांची यादी जाहीर

Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार
Madhya Pradesh Assembly Election
Madhya Pradesh Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Assembly Election : पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

यात मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीचा बिगुल वाजत नाही तोच आता भाजपने 57 उमेदवारांची यादी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे.

Madhya Pradesh Assembly Election
Madhya Pradesh Election 2023 : पतीच्या विजयासाठी पत्नी मैदानात; मध्य प्रदेशात प्रचाराचा धुरळा

केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमांची घोषणा केली. यात मिझोराममध्ये 7 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबर, मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, तर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पाचही राज्यांच्या विधानसभेची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.

मध्य प्रदेशातील आगामी निवडणुकीसाठी भाजपने(BJP) 57 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान(Shivraj Singh Chouhan) बुधनी, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा दतिया, गोपाल भार्गव रेहली, विश्वास सारंग नरेला आणि तुलसीराम सिलावत सानवेरमधून निवडणूक लढवणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर काही तासांतच उमेदवारांची यादी जाहीर करत भाजपने विरोधकांवर आघाडी घेतली आहे. या संबंधीचे ट्विट 'एएनआय'केलं आहे.

मध्य प्रदेशात भाजपची सत्ता असून, तिथे विधानसभेच्या 230 जागा आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता असून, तिथे विधानसभेच्या 200 जागा आहेत, तर मिझोराममध्ये भाजपची सत्ता असून 40 जागा आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे तर 90 जागा आहेत. तेलंगणामध्ये 119 जागांवर विधानसभा निवडणूक होत असून, तिथे भारत राष्ट्र समिती(बीआरएस)सत्ता आहे.(Assembly Election 2023)

आगामी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निडणुकांमध्ये सत्तेत असणारा भाजप, काँग्रेस आणि अन्य प्रादेशिक पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. या निवडणुकांकडे लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जाते. मिझोराम, छत्तीसगड , मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत समाप्त होणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Madhya Pradesh Assembly Election
Central Election Commission News : राजस्थान, मिझोरामसह पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; तीन डिसेंबरला मतमोजणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com