Congress : काँग्रेस आमदाराने राजभवनासमोरच तोंडाला फासले काळे; भाजपला दिले होते ओपन चॅलेंज

Election News : आमदार फूलसिंह बरैया हे काँग्रेसचे आमदार आहेत.
Phool Singh Baraiya
Phool Singh BaraiyaSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Assembly Election : निवडणुकीचे बिगुल वाजले की अनेकांचा उत्साह शिगेला पोहाेचतो, मग या उत्साहाच्या भरात एकमेकांना चॅलेंज देण्याचा, शपथा घेण्याचा सपाटा सुरू होतो. यात आमदार-खासदारही मागे नसतात. चॅलेंज पूर्ण करायची वेळ आली की, भल्याभल्यांना घाम फुटतो. मध्य प्रदेशातील निवडणुकीतही काँग्रेसच्या एका आमदाराने भाजपने 50 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर आपले तोंड काळे करू, असे प्रचारादरम्यान म्हटले होते. पण या आमदाराने जे म्हटले ते करूनही दाखवले आहे.

मध्य प्रदेशमध्ये भाजपला (BJP) 230 जागांपैकी 163 जागांवर विजय मिळाला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस बहुतेक नेत्यांकडून पक्षाला बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. आमदार फूलसिंह बरैया यांनाही भलताच आत्मविश्वास होता. त्यांनी तर थेट भाजपला चॅलेंज केले होते. भाजपला या निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर तोंड काळे करेन, असे वचनच त्यांनी मतदारांना दिले होते.

Phool Singh Baraiya
Telangana : तेलंगणात रेड्डी सरकार; 1400 किलोमीटर पायी फिरलेल्या नेत्यालाही बक्षिसी

या निवडणुकीत भाजपने 50 पेक्षा जास्त जागा मिळाल्याने बरैया यांनी वचन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी गुरुवारी राजभवन गाठले. या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या हातानेच त्यांनी आपल्या तोंडाला काळे फासून घेतले. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

भाजपच्या विजयात ईव्हीएमचा वाटा असल्याचा आरोपही बरैया यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे मतदान घेतले, तर भाजपला 50 जागा मिळतील एवढीही मते मिळणार नाहीत, असे विधान बरैया यांनी केले होते. टपाली मतदानात काँग्रेस 119 जागांवर विजयी झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, बरैया यांचे तोंड काळे केल्यानंतर दिग्विजय सिंह म्हणाले, बरैया हे वचनाला पक्के आहेत. मी त्यांचे अभिनंदन केले. मी त्यांना रोखले, कारण त्यांचा दावा खरा निघाला आहे. टपाली मतदानात भाजपला 50 पेक्षा कमी जागा मिळाल्या. त्यामुळे त्यांना तोंड काळे करण्याची गरज नाही. भाजपने ज्याप्रकारे लोकशाहीची हत्या केली आहे, त्यामुळे तोंड तर त्यांचेच काळे करायला हवे.

(Edited By - Rajanand More)

Phool Singh Baraiya
CM Revanth Reddy : मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच रेवंथ रेड्डींनी घेतले दोन धडाकेबाज निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com