MLA Salary : आमदार हवा तर असा! सलग तिसऱ्या टर्ममध्ये नाकारले वेतन, भत्ते अन् सरकारी सुविधा

Chaitanya Kashyap : चैतन्य कश्यप हे भाजपचे आमदार आहेत.
Chaitanya Kashyap
Chaitanya Kashyap Sarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh News : आमदार, खासदारांच्या वेतन, भत्ते यावरून अनेकदा वादविवाद होतात. कोट्यधीश असलेल्या लोकप्रतिनिधींना एवढे भत्ते कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जातो. पण अनेकदा टीका होऊनही वेतन, भत्ते सतत वाढतच जातात. एका आमदाराने मात्र आदर्श घालून दिला आहे. आमदारकीच्या सलग तिसऱ्या टर्ममध्ये वेतन, भत्ते तसेच सरकारी सुविधा न घेण्याचे जाहीर केले आहे. 

चैतन्य कश्यप (Chaitanya Kashyap) असे या आमदाराचे नाव आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रतलाम शहर विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. भाजपशी (BJP) एकनिष्ठ असलेले कश्यप कोट्यधीश आहेत. ते व्यावसायिक असून त्यांची संपत्ती जवळपास 296 कोटींची आहे. ते मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. मध्य प्रदेशात एका आमदाराला महिन्याला जवळपास एक लाख रुपये वेतन मिळते. शिवाय भत्ते व सुविधा वेगळ्या असतात.

Chaitanya Kashyap
Amit Shah : गृहमंत्री अमित शाहांचा मोठा निर्णय; काश्मीरमधील 'या' मुस्लीम संघटनेवर बंदी

कश्यप यांनी सलग तिसऱ्यांचा निवडणूक जिंकली आहे. आता ते मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. 2002 ते 2013 या कालावधीत ते भाजपच्या सामाजिक संस्था शाखेचे राष्ट्रीय संयोजक होते. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश भाजपचे कोषाध्यक्ष यांसह विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. 2013 मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासूनच त्यांनी वेतन आणि भत्ते घेतले नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, माजी मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharti) यांनी चैतन्य कश्यप यांच्या या निर्णयाशी असहमती दर्शवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 296 कोटींची संपत्ती असलेली व्यक्ती सरकारचे १२ लाख सोडत असेल, त्यात काहीच मोठेपणा नाही. कश्यप यांनी सरकारला वेतन परत करण्यापेक्षा गरीब मुलींच्या शिक्षणावर खर्च करावेत. सर्व आमदार मोठे व्यावसायिक नसतात, ते राजकारणातून आपला व्यवसायही वाढवत नाहीत.

Chaitanya Kashyap
Pulwama : लवकरच पुलवामासारखा हल्ला! सोशल मीडियात पोस्ट करणाऱ्यास अटक, राजनाथ सिंह काश्मीरमध्ये

जर आमदार आणि खासदारांना प्रामाणिकपणाच्या मार्गाने जाणे सोपे करायचे असेल तर चेतन कश्यप यांच्यासारख्या श्रीमंत आमदारांना सोडून उर्वरित सर्व आमदारांचे वेतन आणि भत्ते आजच्या परिस्थिती पाहून मिळायला हवे, असेही उमा भारती यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजपचे खासदार वरुण गांधी यांचेही उदाहरण दिले. खासदारांनी वेतन घेऊ नये, असे ते म्हणाले होते. पण ते असे करू शकतात कारण ते हजारो कोटींचे मालक आहेत, असे उमा भारती यांनी सांगितले.

Edited by Rajanand More

Chaitanya Kashyap
Ram Mandir News : राम मंदिराबाबत ममतादीदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com