Madhya Pradesh Cabinet : मोदी-शाह यांचा मंत्रिमंडळ विस्तारातही धक्का; 17 आमदार पहिल्यांदाच मंत्री

CM Mohan Yadav : मध्य प्रदेशमध्ये 30 जणांचे मंत्रिमंडळ झाले असून त्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत.
Madhya Pradesh Cabinet
Madhya Pradesh CabinetSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशसह राजस्थान व छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री ठरवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी धक्कातंत्राचा वापर केला होता. तीनही राज्यांत अनपेक्षितपणे नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. आता मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळ विस्तारातही मोदी-शाह यांनी तसेच धक्कातंत्र वापरले आहे. सोमवारी शपथ घेतलेल्या 28 पैकी तब्बल 17 आमदार पहिल्यांदाच मंत्री बनले आहेत.

मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री मोहन यादव (CM Mohan Yadav) यांचे मंत्रिमंडळ 30 जणांचे झाले असून त्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत. तर सोमवारी 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची आणि दहा जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी सर्वांना शपथ दिली. या शपथविधीचे वैशिष्ट्य म्हणजे 17 जणांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यातील काही जण पहिल्यांदाच आमदार बनले आहेत.

Madhya Pradesh Cabinet
India Alliance : ‘इंडिया’तील जागावाटपावर जयराम रमेश यांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, तोंड बंद आणि...

मंत्रिमंडळात राजेंद्र शुक्ला व जगदिश देवडा हे उपमुख्यमंत्री आहे. तर कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya), प्रल्हाद पटेल, राकेश सिंह या महत्त्वाच्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मागील मंत्रिमंडळातील अनेकांना डच्चू देण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात सर्व घटकांतील नेत्यांचा समावेश करण्यात आल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसी घटकांतील 12 मंत्री असून खुल्या प्रवर्गातील सात, अनुसूचित जाती प्रवर्गातील पाच आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील चार आमदारांनी सोमवारी शपथ घेतली. याविषयी बोलताना माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, प्रशासनदिनाच्या पार्श्वभूमीवर शपथविधी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुशासन येईल.

हे आमदार झाले पहिल्यांदाच मंत्री

राकेश सिंह, प्रल्हाद पटेल, संपतिया उईके, उदय प्रताप सिंह, नागर सिंह चौहान, चैतन्य कश्यप, राकेश शुक्ला, कृष्णा गौर, धर्मेंद लोधी, दिलीप जयस्वाल, गौतम टेटवाल, लखन पटेल, नारायण पवार, राधा सिंह, प्रतिमा बागरी, दिलीप अहिरवार आणि नरेंद्र शिवाजी पटेल.

Madhya Pradesh Cabinet
Political News : 'कर्जमाफीसाठी वर्षानुवर्षे दुष्काळ पडावा'; कानडी मंत्र्यांच्या वक्तव्याने मोठा वाद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com