Political News : 'कर्जमाफीसाठी वर्षानुवर्षे दुष्काळ पडावा'; कानडी मंत्र्यांच्या वक्तव्याने मोठा वाद

Shivanand Patil : शिवानंद पाटील यांनी यापूर्वीही अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.
Shivanand Patil
Shivanand PatilSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : अनेक राजकीय नेते अजब वक्तव्य करून वाद ओढवून घेतात. असाच वाद कर्नाटकातील मंत्री शिवानंद पाटील यांच्याही वक्तव्यामुळे निर्माण झाला आहे. कर्जमाफी मिळावी यासाठी शेतकरी वर्षानुवर्षे दुष्काळ पडावा, अशी प्रार्थना करत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून भाजपने सिध्दरामय्या सरकारवर जोरदार टीका केली आहे.

शिवानंद पाटील (Shivanand Patil) हे कर्नाटक (Karnataka) सरकारमध्ये ऊस विकास मंत्री आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झाला आहे. ते म्हणाले आहेत की, कृष्णा नदीचे पाणी मोफत मिळते. वीजही मोफत आहे. अनेक मुख्यमंत्र्यांनी मोफत बी-बियाणे दिले. शेतकऱ्यांच्या (Farmers) मनात केवळ एकच प्रार्थना असते, कर्जमाफीसाठी वर्षानुवर्षे दुष्काळ पडावा.

Shivanand Patil
Kolhapur Politics : महाडिक-मुश्रीफांची दिलजमाई ?; दोघांच्या बुलेट राईडने विरोधकांना धडकी

पाटील यांचे हे विधान व्हायरल झाल्यानंतर भाजपने टीका केली आहे. सिध्दरामय्या यांचे मंत्रिमंडळ म्हणजे मुर्खांनी भरलेले आहे. हे शेतकरीविरोधी सरकार असून शेतकऱ्यांना अपमानित करत आहे, त्यांची चेष्टा करत असल्याचे भाजपने म्हटले आहे. पाटील यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सप्टेंबर महिन्यांत त्यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, ‘राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर दिली जाणारी मदत वाढवल्यानंतर आत्महत्यांमध्ये वाढ झआली आहे.’ यावरून टीका झाल्यानंतर त्यांनी घुमजाव करत आपल्याला शेतकऱ्यांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, असे म्हणत सारवासारव केली होती.

Shivanand Patil
Ajit Pawar : अजितदादांचं अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज; शिरूरमधील उमेदवारीबाबत मोठं विधान...

शिवानंद पाटील हे बसवना बागेवाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा एका कार्यक्रमातील त्यांच्यावर नोटा उडवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ते कार्यक्रमात बसलेले असताना अन्य लोकांद्वारे नोटा उडवल्या जात होत्या. काही नोटा त्यांच्यावर पायावरही पडल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष करत ते गप्पा मारण्यात व्यस्त असल्याचे दिसत होते. त्यावेळीही त्यांनी आपण नोटा उडवल्या नसल्याचे सांगत केवळ लग्नात उपस्थित राहिलो, असे सांगितले होते.

(Edited By - Rajanand More)

Shivanand Patil
Aaditya Thackeray News : महाराष्ट्राच्या राजकीय सर्कशीत 40 जोकर; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर वार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com