Kolhapur Politics: महाडिकांना नेमका कोणाचा 'गेम' करायचाय? मुश्रीफांना राज्यस्तरावर डॅमेज, तर सतेज पाटलांना जिल्ह्यातच रोखण्याची खेळी...

Gokul Dudh Sagh Election : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपेक्षा गोकुळमधील पराभव हा महाडिक यांच्या जिव्हारी लागला. पण भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर राज्यसभेत एन्ट्री घेत महाडिक गटाला पुन्हा ऊर्जित अवस्था मिळाली. तोपर्यंत सतेज पाटील यांनी जिल्ह्यात प्रस्थ तयार केले.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी महाडिक गटाच्या ताब्यात असलेल्या एकेक सहकारी संस्था ताब्यात घेण्यास सुरुवात केली. विधानसभा, लोकसभा आणि पाठोपाठ गोकुळ घेण्यासाठी देखील सतेज पाटील यांनी मुश्रीफांना सोबत घेऊन शड्डू ठोकला. पंचवीस वर्षे सत्ता असलेल्या महाडिक गटाला शह देत सत्ता उलथवून टाकली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपेक्षा गोकुळमधील पराभव हा महाडिक यांच्या जिव्हारी लागला. पण भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर राज्यसभेत एन्ट्री घेत महाडिक गटाला पुन्हा ऊर्जित अवस्था मिळाली. तोपर्यंत सतेज पाटील यांनी जिल्ह्यात प्रस्थ तयार केले.

पण विधानसभा निवडणुकीनंतर दहा जागांवर महायुती आल्याने पुन्हा एकदा महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर एकेक डाव खेळण्यास सुरुवात केली. मात्र, महायुतीतील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची अडसर ठिकठिकाणी येत आहे. त्यामुळे आता सतेज पाटील यांना जिल्ह्यातच रोखून मंत्री हसन मुश्रीफ यांना राज्यस्तरावरील वरिष्ठ नेत्यांत डॅमेज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे महाडिक हे नेमका कोणाचा गेम करत आहेत. हे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरूनच स्पष्ट होणार आहे.

चार वर्षांपूर्वी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाडिक गटाचे संचालक फोडून सत्ता मिळवली. महाडिक गटाचे दोन प्रमुख शिलेदार गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि अध्यक्ष अरुण डोंगळे यांना हाताशी धरून सत्ता मिळवली. त्यावेळी राज्यातील महाविकास आघाडीतील दोन पक्ष एकत्र होते. पण सध्याची परिस्थिती पाहता राज्यात महायुतीचे सरकार आहे.

Kolhapur Politics
Indian Defence Budget : भारतानं 'ऑपरेशन सिंदूर'नंतर कुरापती पाकिस्तानविरुद्ध उचललं मोठं पाऊल; संरक्षण बजेटमध्ये तब्बल 50 हजार कोटींची वाढ?

शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट आहेत. त्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील महायुतीचे संचालक गोकुळमध्ये आहेत. ज्या पद्धतीने सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीला एकत्र करत गोकुळ वर सत्ता मिळवली. त्याच गोकुळमध्ये राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीच्या नेत्यांना एकत्र करत सतेज पाटील यांचे मनसुबे उधळण्याचे डावपेच आखले आहेत.

ज्या अरुण डोंगळे यांना सत्तारूढ गटातून फोडले, त्याच अध्यक्ष डोंगळे यांना पुढे करून मंत्री हसन मुश्रीफ-सतेज पाटील जोडीला शह देण्याची महाडिक गटाची पहिली खेळी खेळली आहे. सुरुवातीला धनंजय महाडिक यांनी गोकुळ वर महायुतीचा अध्यक्ष आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसन मुश्रीफ यांची बाजू घेत परिस्थिती समजावून घेतली.

Kolhapur Politics
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडी वाढल्या; ममता बॅनर्जींचा निवडणुकीच्या तोंडावर दोन बड्या नेत्यांना झटका

गोकुळमधील परिस्थिती जैसे ते ठेवण्याचे आदेश महाडिक यांना दिले. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि पुढील वर्षी होणारी गोकुळची निवडणूक पाहता गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष असावा, यासाठी महाडिक यांनी आता अरुण डोंगळे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. अशी चर्चा जोरात सुरू आहे.

सहकार असो अथवा विधानसभा निवडणुक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ महायुतीत असून देखील काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्याबाबत सॉफ्ट भूमिका ठेवली आहे. हे वारंवार होणाऱ्या कृतीतून स्पष्ट होत आहे. शिवाय 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांची भूमिका महाडिक यांना संशयास्पद वाटत आहे. सातत्याने मुश्रीफ हे पाटील यांची बाजू घेत असल्याचे निदर्शनास येताच् मुश्रीफ यांना रोखण्यास थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच यांचाच आधार महाडिक यांच्यासह डोंगळे यांनी घेतला.

Kolhapur Politics
India-Afghanistan Friendship : मुस्लीम देश असूनही अफगाणिस्तानचा भारताला सपोर्ट; '2' खास कारणांनी बहरली मैत्री

सतेज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, डॉ . विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, यांच्या विरोधात प्रचार केल्याने महाडिक यांनी अंतर्गत यांना देखील हाताशी धरले आहे. हेच नेते गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांच्या कामी आले होते. त्यामुळे आता सहाजिकच पाटील हे कोंडीत सापडले आहेत.

अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन दिवसांपूर्वी सतेज पाटील म्हणतील तेच अध्यक्ष असे सांगितल्यानंतर महायुतीच्या नेत्यांच्या ते पचनी पडलेले नाही. त्यामुळे दोन दिवसातील ही घडामोड आणखी खळबळजनक बनली आहे.

आगामी गोकुळची निवडणूक पाहता महायुतीच्या बाजूनेच गोकुळचा कल राहण्यासाठी आणि डोंगळे हेच अध्यक्ष कायम राहावेत यासाठी थेट राज्य पातळीवरील नेत्यांचा पहिल्यांदाच हस्तक्षेप झाला . त्यामुळे गोकुळच्या राजकारणाला चांगलीच रंगत आली. डोंगळे यांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेऊन सतेज-मुश्रीफ यांची कोंडी केली.

Kolhapur Politics
Kolhapur Politics : "फडणवीसांना 'गोकुळबद्दल' काही माहिती नाही..." : डोंगळेंच्या बंडाला हवा दिल्याने मुश्रीफ प्रचंड संतापले!

डोंगळे यांच्या या बंडखोरीला सरकारमधून आणि पर्यायाने महाडिक यांच्याकडून फडणवीस-शिंदे यांची ताकद मिळाली. डोंगळे यांना यानिमित्ताने दिलेली ही ताकद म्हणजे ‘गोकुळ’च्या राजकारणात मुश्रीफ यांच्यापेक्षा आमदार सतेज पाटील यांना शह देण्याची खेळी आहे. डोंगळे आपल्या निर्णयावर ठाम राहतात, त्यांच्यावर अविश्‍वास आणला जातो की नवा अध्यक्ष होतो, यावर ही खेळी कितपत यशस्वी होते हे ठरणार आहे.

राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत. खासदार धनंजय महाडिक असो किंवा अमल महाडिक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबुक’मध्ये आहेत. कार्यकर्त्याने एखादे काम सांगितले तर ते कोणत्याही परिस्थितीत करायचे ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाची पध्दत आहे. त्यामुळे मुश्रीफ किंवा महायुतीतील अन्य नेत्यांनी काहीही केले आणि फडणवीस यांनी महाडिक यांनाच साथ द्यायची ठरवली तर महाडिक गट म्हणेल तेच ‘गोकुळ’मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतेज पाटील यांना गोकुळ मध्ये हटवण्यासाठी पहिल्यांदा महाडिक गटाला मुश्रीफ यांना कोंडीत पकडणे गरजेचे वाटले असावे. त्यामुळे वरिष्ठ स्तरांवरूनच त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचा पहिला डाव महाडिक यांनी मुश्रीफ यांच्यावर केला आहे.

Kolhapur Politics
Gokul Dudh Sangh: मुन्नाचं ज्ञान कमी, बंटीनं काढला वचपा; 'गोकुळ'च्या अध्यक्षपदावर आज मार्ग निघणार?

विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 10 आमदार निवडल्याने सध्या महाविकास आघाडी कुमकुवत झाली आहे. या परिस्थितीत गोकुळ मधील सत्ता घालवल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे राजकीय पकड ठेवण्यासाठी दुवा शिल्लक राहत नाही. सध्या सतेज पाटील विधान परिषदेचे आमदार आहेत.

'स्थानिक स्वराज्य'च्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांच्याकडून गोकुळ काढून घेतल्यावर पाटील गटाची ताकद कुमकवत होणार आहे. त्यामुळे सतेज पाटील यांना जिल्ह्यातच रोखण्याचा प्रयत्न महाडिक गटाचा आहे. जर डोंगळे यांनी राजीनामा नाही दिला तर त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो. अविश्वास ठराव आल्यास पाटील यांना ठराव मंजूर करण्यासाठी मोठे आव्हान असणार आहे.

Kolhapur Politics
Gokul Dudh Sangh : मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या डोंगळेंना ‘गोकुळ’चे 19 संचालक दाखविणार ‘कात्रज’चा घाट; एका रात्रीत फिरली चक्रे!

जर मुश्रीफ आणि महायुतीतील संचालकांनी यांनी सतेज पाटील यांच्या बाजूने भूमिका घेतली ठराव मंजूर करण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. पण वरिष्ठ स्तरावरून मुश्रीफ यांच्यावर दबाव, आणि संचालकांना निरोप आले तर मात्र सतेज पाटील यांना विश्वास ठराव मंजूर करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com