MP Election 2023 : कोण जिंकणार भाजप की काँग्रेस; चक्क स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं, पाच साक्षीदार...

Madhya Pradesh Election 2023 : नीरज मालवीय आणि धनिराज भलावी यांच्यात ही पैज लागली आहे. भालवी हे माजी सरपंच आहेत.
Madhya Pradesh Election 2023
Madhya Pradesh Election 2023Sarkarnama
Published on
Updated on

विधानसभेच्या 230 जागांसाठी मध्य प्रदेशात मतदान झाले असून, येत्या तीन तारखेला निकाल आहे. राज्यभर भाजप आणि काँग्रेस यांच्यातच प्रामुख्याने लढती रंगल्याचे दिसून आले. भाजप विरोधात असलेल्या नाराजीचा फायदा काँग्रेसने घेतला असल्याचे प्रचारात बोलले गेले. आता निकालापूर्वीच उमेदवार, पक्षांवर सट्टा लावण्यात येत आहे. अशातच समाज माध्यमांवर एक स्टॅम्प पेपरवर व्हायरल होत आहे.

दोन जणांनी भाजप-काँग्रेसच्या जय-पराजयांसाठी एक लाख रुपयांची पैज लावली आहे. त्यासाठी एका स्टॅम्प पेपरवर पाच साक्षीदारांनी सह्या केल्या आहेत. एकाने काँग्रेस आणि दुसऱ्याने भाजपचं सरकार स्थापन होईल, असा दावा केला आहे. नीरज मालवीय आणि धनिराज भलावी यांच्यात ही पैज लागली आहे. भालवी हे माजी सरपंच आहेत.

Madhya Pradesh Election 2023
Shiv Sena : शिवसेनेच्या दोन आमदारांची अपात्रतेतून सुटका होणार; 'हे' आहे कारण

मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली तर मालवीय हे भालवी यांना एक लाख रुपये देणार आहेत. दुसरीकडे भाजपने सत्ता स्थापन केली तर भालवी हे मालवीय यांना एक लाख रुपये देणार आहेत.

मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांच्या जय-पराजयावर १० लाख रुपयांची पैज लागली आहे. कमलनाथ यांच्या पराभवावर 10 लाख रुपयांची पैज लावण्यात आली आहे, तर भाजपचे उमेदवार बंटी साहू निवडणुकीत पराभूत झाल्याने एक लाख रुपयांची शर्यत लावण्यात आली आहे.

दोघांमध्ये लावण्यात आलेल्या पैजेत स्टॅम्प पेपरवरील तीन साक्षीदारांच्या सह्यादेखील आहेत. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर या पैज लावणाऱ्यानी ही पैज रद्द केली जाईल, असे सांगितले. शहरातील लालबाग येथील रहिवासी प्रकाश साहू आणि राम मोहन साहू यांनी अॅग्रिमेंट तयार केले होते.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Madhya Pradesh Election 2023
Sanjay Raut : पिंपरीत पुन्हा शिवसेनेचा आमदार करण्याचे शिवधनुष्य राऊतांना पेलणार का?

राज्यातील काही प्रांतात काँग्रेससाठी पोषक वातावरण राहिले, तर दुसरीकडे भाजपने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडली बेहना योजना सुरू करीत महिलांच्या खात्यावर थेट पंधराशे रुपये जमा करणे सुरू केल्याने महिला मतदार भाजपच्या बाजूने झुकल्याचे दिसले. असे असले तरी भाजपला एकतर्फी वाटावी असा निवडणुकीचा निकाल येण्याची शक्यता कमी आहे.

मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपने जनतेसमोर आणलेला नाही. काँग्रेसने कमलनाथ यांनाच मुख्यमंत्री म्हणून मतदारांसमोर आणले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक असले तरी भाजपकडून मात्र त्यांच्याबाबत नाराजी असल्याचे बोलले जाते.

निवडणुकीमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून शिवराम सिंह चौहान यांना प्रोजेक्ट केलेच नाही. भाजपला बहुमत मिळाल्यास मध्य प्रदेश राज्याला नवा चेहरा असलेला मुख्यमंत्री मिळेल. राज्यात सरासरी 72 टक्के मतदान झाले आहे. अनेक जागांवर चुरशीच्या लढती झाल्या आहेत. एकतर्फी विजयी होण्याच्या जागा अत्यंत कमी असल्याने सरकार कोणाचे होणार हे तीन तारखेनंतरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com