Shiv Sena : शिवसेनेच्या दोन आमदारांची अपात्रतेतून सुटका होणार; 'हे' आहे कारण

MLA Disqualification Case : विधान परिषद शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चिता आहे.
MLA Disqualification Case
MLA Disqualification Case Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यावर सुनावणी सुरू असतानाच दोन आमदारांची अपात्रतेच्या धोक्यातून सुटका होण्याची शक्यता दिसते.

आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर पडत असून, पात्रता प्रकरणातील याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चितता कायम आहे. असे असले तरी शिवसेनेच्या दोन आमदारांची यातून सुटका होणार आहे.

आमदार मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांच्या विधान परिषद आमदारकीचा कार्यकाळ पुढील काही महिन्यांत संपणार असल्याने त्यांची या अपात्रतेच्या धोक्यापासून सुटका होण्याची चिन्हे आहेत.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिकाही प्रलंबित आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Disqualification Case
Maratha Reservation : पाचशे जणांवर गुन्हे, फक्त ऋषिकेश बेदरेलाच का अटक ? मराठा समाज रस्त्यावर

विधान परिषद शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चिता आहे. सभापतींची निवड झाल्यावरच ती होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातील याचिकांसंदर्भात संबंधितांना पुढील आठवड्यात नोटिसा बजावल्या जाणार असून, याचिकेवर जानेवारीमध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आपल्याविरोधातील याचिकेवर स्वत:च सुनावणी घेणे शक्य नसल्याने डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या तीनही आमदारांविरोधातील याचिका प्रलंबित ठेवण्याचे तूर्तास ठरविले आहे. त्यामुळे सभापतींची निवडणूक होईपर्यंत शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी रखडण्याची चिन्हे आहेत.

MLA Disqualification Case
MLA Nilesh Lanke : मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर लंके पोहाेचले शेतकऱ्यांच्या बांधांवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com