Madhya Pradesh Election 2023 : कसली सरकारविरोधी लाट? शिवराजसिंह चौहान यांच्या योजनाच ठरल्या गेमचेंजर

Election Results 2023 : शिवराजसिंह चौहान यांची लाडली बहना ही योजना राज्यात विशेष लोकप्रिय ठरली.
Assembly Election Madhya Pradesh
Assembly Election Madhya PradeshGoogle
Published on
Updated on

Election Results 2023 : मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारादरम्यान सरकारविरोधी लाट असल्याची हवा काँग्रेसकडून करण्यात आली होती. त्यामुळे काही एक्झिट पोलमध्ये भाजपचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता, पण हे अंदाज फोल ठरवत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यात पुन्हा कमळ फुलविण्यात यश मिळवले आहे. लाडली बहना, लाडली लक्ष्मी या योजनांमध्ये चौहान यांची प्रतिमा ‘मामा’ म्हणून अधिक बळकट झाली. यांसह महिला व युवकांसाठी सुरू केलेल्या विविध योजनाच गेमचेंजर ठरल्याचे बोलले जात आहे.

शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांची लाडली बहना ही योजना राज्यात विशेष लोकप्रिय ठरली. या योजनेत पात्र महिलांना 1250 रुपये दिले जात आहेत. त्याचा फायदा 1 कोटी 30 लाख महिलांना होत आहे. राज्यात महिला मतदारांची संख्या 2 कोटी 71 लाख एवढी आहे. जवळपास 50 टक्के महिला या योजनेत पात्र ठरत असल्याने चौहान यांच्या प्रतिमेला बळ देण्यास ही योजना महत्त्वाची ठरली. चौहान यांच्यासह सर्व नेत्यांकडून या योजनेला आता श्रेय दिले जात आहे. (Madhya Pradesh Assembly Election 2023)

Assembly Election Madhya Pradesh
Assembly Election Results 2023 : मंदिर पॉलिटिक्सचा फंडा; मध्य प्रदेश, राजस्थानात जोरात

लाडली लक्ष्मी योजनेत त्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जात आहे. मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर तिला दोन लाख रुपये मिळणार आहेत. कन्यादान योजनाही लोकप्रिय ठरली. या योजनेत आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी मदत केली जाते. रुग्णालयांमध्य़े प्रसूतीसाठी महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनेमुळे राज्यातील रुग्णालयांमधील प्रसूती वाढल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

युवकांसाठी कमवा व शिका ही योजनाही लोकप्रिया ठरत आहे. यात 18 ते 29 वयोगटातील तरुण पात्र आहेत. याअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आठ हजार, आयटीआय उत्तीर्णांना साडेआठ हजार, डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नऊ हजार तर पदवी व त्यापुढील विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दिले जातात. स्वयंरोजगारासाठी मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना या योजना प्रभावीप्रमाणे राबविण्यात आल्या.

या योजनांप्रमाणेच भाजपने घोषणापत्रात केलेल्या घोषणाही मतदारांना भावल्याचे दिसते. केजी ते पीजीपर्यंतच्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, 450 रुपयांत स्वयंपाकाचा गॅस, शंभर युनिट वीज शंभर रुपयांत, आदिवासींच्या विकासासाठी तीन लाख कोटी रुपये देणार, प्रत्येक कुटुंबातील एकाला रोजगार, शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये, मेडिकल सिटी, लाभार्थ्यांना पाच वर्षे मोफत रेशन अशा भाजपने केलेल्या अनेक लोकप्रिय घोषणा महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Assembly Election Madhya Pradesh
Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : राजस्थान-मध्य प्रदेशात भाजपचं निर्विवाद वर्चस्व; काँग्रेसला चिंतनाची गरज!

काँग्रेसकडूनही अनेक लोकप्रिय घोषणा करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. पण मुख्यमंत्री चौहान यांनी सुरू केलेल्या योजना आणि त्याची प्रभावीपणे सुरू असलेली अंमलबजावणीने भाजपला यश मिळवून दिल्याचे दिसते. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात चौहान यांच्याकडे भाजपने कानाडोळा केल्याचे दिसत होते, पण नंतर चौहान यांना मैदानात उतरवल्यानंतर चित्र बदलत गेल्याचे जाणकार सांगतात.

चौहान यांनी विशेषत: महिलांसाठी राबविलेल्या योजनाच गेमचेंजर ठरल्याचे भाजपमधील नेतेही मान्य करू लागले आहेत. चौहान यांनी प्रत्येक प्रचार सभेत आपल्या योजनांचाच प्रामुख्याने उल्लेख केला. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. महिलांनी भाजपला भरभरून साथ दिल्याने चौहान यांनीही पहिल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडून राज्यात सरकारविरोधी लाट असल्याची हवा करण्यात आली होती, पण त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

(Edited By - Rajanand More)

Assembly Election Madhya Pradesh
Election Results 2023 : काँग्रेसच्या पराभवाने 'इंडिया'तील घटक पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com