Lucknow News : मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळविल्यानंतर इंडिया आघाडीतील मित्र पक्षांकडून काँग्रेसच्या पराभवावर प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात समाजवादी पक्षाची प्रतिक्रिया अत्यंत तिखट स्वरूपाची आहे. ‘माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या अहंकाराने काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये पराभूत केले,’ असा हल्लाबोल सपाने केला आहे, त्यामुळे इंडिया आघाडीत खटके उडायला सुरुवात झाली आहे. (Defeat of Congress due to Kamal Nath's Arrogance: SP's Attack)
मध्य प्रदेशात काँग्रेसच्या पराभवाला समाजवादी पक्षाने कमलनाथ यांना जबाबदार धरले आहे. कमलनाथ यांच्या असभ्य विधानांमुळे काँग्रेसचा मध्य प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी कमलनाथ यांचा अहंकार शिगेला पोहोचला होता, असा टोला समाजवादी पक्षाचे प्रवक्ते मनोज सिंह काका यांनी कमलनाथ यांना लगावला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेसकडे पाच जागांची मागणी केली होती. मात्र, कमलनाथ यांनी समाजवादी पक्षाला एकही जागा सोडण्यास नकार दिला होता. त्यांनी आमच्या नेत्यांचा अपमान केला. मागासवर्गीयांना तुम्ही पाच जागा देऊ शकत नसाल, तर तुम्हाला मते कशी मिळणार? असा सवाल मनोज सिंह यांनी केला.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अखिलेश यादव यांच्याविरोधात अशोभनीय वक्तव्य केले. चार वेळा खासदार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या अखिलेश यांना कमलनाथ यांनी ‘अखिलेश-वखिलेश’ असे संबोधले, ज्यामुळे केवळ मध्य प्रदेशच नाही तर जिथे जिथे निवडणुका झाल्या तिथे बहुजन वर्ग आणि मागासवर्गीय दुखावले गेले आणि त्याचा विपरीत परिणाम निकालावर झाला आहे.
अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीचा भागीदार म्हणून मध्य प्रदेशमध्ये काही जागांची मागणी केली होती. कमलनाथ यांनी सपाला एकही जागा देण्यास नकार दिला होता. कमलनाथ यांच्या या वागण्याने अखिलेश यादव दुखावले गेले. उत्तर प्रदेशातही सपा प्रमुखांचा अपमान केल्याचा मुद्दा जोरात मांडण्यात आला. सपा नेत्यांनी काँग्रेसविरोधात आघाडी उघडली आहे. मध्य प्रदेशात पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या अखिलेश यादव यांनी मतदारांना काँग्रेसपासून सावध राहण्याचा सल्लाही दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.