MahaKumbh Stampede : कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर CM योगींचं भाविकांना मोठं आवाहन; म्हणाले, "तुम्ही ज्या घाटाजवळ आहात..."

Prayagraj Mahakumbh Mela 2025 : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्यासाठी आलेल्या सर्व भाविकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
Yogi Adityanath
Yogi AdityanathSarkarnama
Published on
Updated on

Mahakumbh Mela News : प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात मंगळवारी (ता.29) मध्यरात्री चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्यासाठी आलेल्या सर्व भाविकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

CM योगींनी (Yogi Adityanath) भाविकांनी कोणत्याही अफवांकडे लक्ष न देण्याचं आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. योगी यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेचा आढावा घेतल्यानंतर एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, गंगा मातेच्या प्रत्येक घाटावर स्नानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Yogi Adityanath
Mahakumbh Mela Stampede : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी 10 जणांचा मृत्यू तर शेकडो भाविक जखमी, अमृतस्नान रद्द करण्याचा निर्णय

त्यामुळे भाविकांनी जवळच्या घाटावर स्नान करावे आणि मुख्य संगमाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू नये. स्नानाचा हा पवित्र सोहळा निर्विघ्न व सुरक्षितपणे पार पडावा यासाठी शासन व प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुचनांचे पालन करा आणि कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका, असं त्यांनी म्हटलं आहे.

Yogi Adityanath
Sarkarnama Politics LIVE Updates : सर्वसामान्यांसाठी ठिकठिकाणी वसतिगृह उभारणार - एकनाथ शिंदे

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यासाठी लाखो भाविकांची गर्दी जमा होत आहे. प्रशासनाकडून स्नानासाठी वेगवेगळे घाट तयार करण्यात आले आहेत. मात्र तरीही भाविक ठराविक घाटावर जाऊन स्नान करण्याता आग्रह धरत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे प्रसिद्ध किंवा जे घाट पवित्र मानले जातात अशा ठिकाणी लोक गर्दी करत आहेत. त्यामुळे लोकांना जिथे सहज स्नान करता येऊ शकते तिथेच त्यांनी स्नान करावं अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.

चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे?

महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात संगम किनाऱ्यावर गर्दी केली. गर्दी वाढल्याने पोलिस लोकांना घाटावरुन बाजूला करत असतानाच काही जण इकडे तिकडे पळू लागले. यावेळी काही ठिकाणी बॅरिकेड तुटल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com