PM Narendra Modi : जनता ‘चेले चपाटे’ घरी पाठवणार! पंतप्रधान मोदींचा कुणावर निशाणा?

Maharashtra Assembly Election Mahayuti Solapur Rally : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर येथील सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सोलापूर येथे झालेल्या प्रचारसभेत महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी या निवडणुकीत महाराष्ट्रातून शाही परिवाराचे चेले चपाटे जनता घरी पाठवणार असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे मोदींनी चेले चपाटे कुणाला उद्देशून बोलले याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

पंतप्रधान मोदींची मंगळवारी पहिली सभा चिमूर येथे झाली. त्यानंतर सोलापूर येथील सभेत त्यांनी पुन्हा काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, आमचे विकासाचे ट्रॅक रेकॉर्ड आहे. पण काँग्रेसची तीच जुनी टेप रेकॉर्ड असून खोट्याचे दुकान आहे. त्याच अफेवेचे टेप रेकार्ड हरियाणातही वाजवले होते. पण तेथील जनेतेने त्यांना ओळखले आणि नाकारले.

PM Narendra Modi
Caste based Census : जातनिहाय जनगणना होणार की नाही? केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान...

मी झारखंड, महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन आलोय. या निवडणुकीत महाराष्ट्रातून शाही परिवाराचे चेले चपाटे जनता घरी पाठवणार आहे. आपल्याला फक्त सावधान राहायचे आहे. एकीने पुढे जायचे आहे. आज कानाकोपऱ्यातून महायुतीचे सरकार पाहिजे, हा एकच आवाज संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहे, असे मोदी म्हणाले.

मुख्यमंत्रिपदावरून नुरा कुस्ती

मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीमध्ये नुरा कुस्ती सुरू असल्याची टीका केली. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला. महाआघाडीवाले ज्या गाडीत चालले आहेत, त्या गाडीला ना चाके आहेत, ना ब्रेक. कोण चालवणार यावरून मारामार सुरू आहे. ही सर्वात अस्थिर गाडी आहे. हे लोक आपआपसांत भांडणांतच वेळ घालवत आहेत, असा टोला मोदींनी लगावला.

PM Narendra Modi
Rahul Gandhi VIDEO: चिखलीतील सभा रद्द होऊनही राहुल गांधींनी मुद्द्यालाच हात घातला! म्हणाले...

महाआघाडीमध्ये आतापासूनच मुख्यमंत्रिपदावरून नुरा कुस्ती सुरू आहे. एक पक्ष दिवसभर आपल्या नेत्याला मुख्यमंत्री सांगण्यात अडकली आहे. तर दुसरा पक्ष आणि काँग्रेस त्यांची दावेदारी खोडून काढत आहेत, असा निशाणा मोदींनी साधला. आताच आघाडीचे हे हाल आहेत, त्यामुळे ते महाराष्ट्राला कधीही स्थिर सरकार देऊ शकत नाहीत, अशी टीकाही मोदींनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com