Maharashtra Karnatak Dispute : न्यायालय निर्णय घेत नाही, तोपर्यंत सीमाप्रश्नी दावा करू नका; अमित शहांची मध्यस्थी!

Maharashtra Karnatak Dispute : दोन्ही राज्यांच्या तीन तीन मंत्र्याची आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती बनवली जाईल.
Maharashtra Karnatak Dispute
Maharashtra Karnatak DisputeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Karnatak Dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या भेटीवर आहेत. केंद्रिय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सुद्धा उपस्थित होते. सीमाप्रश्नी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत.

Maharashtra Karnatak Dispute
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिंदे-फडणवीसांच्या स्वप्नांवर फेरले पाणी

बैठकीनंतर अमित शहा म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही पक्षाकडून बोलणी झाली. यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कोणताही राज्या सीमाप्रश्नी कसलाही दावा करणार नाही. दोन्ही राज्यांच्या तीन तीन मंत्र्याची आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती बनवली जाईल. दोन्ही राज्यांकडून शांतता परिस्थिती राखली जाईल.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद हा विवाद संपवण्यासाठी आणि याच्या संविधानिक मार्गासाठी मी दोन्ही पक्षांशी चर्चा केली आहे. या प्रश्न संविधानिक मार्गानेच सुटेल. दोन्ही राज्यात कायदा सुव्यस्थेची परिस्थिती राखली गेली पाहिजे. दोन्ही राज्यातील एकमेकांच्या भाषिकांना उपद्रव होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशी अपेक्षा अमित शहांनी व्यक्त केली.

Maharashtra Karnatak Dispute
Ajit Pawar News : अजित पवारांना सर्वोच्च न्यायालायाचा मोठा दिलासा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com