Karuna Munde: महाराष्ट्राचं राजकारण हादरवणाऱ्या 'हनी ट्रॅप' प्रकरणात धक्कादायक वळण; करुणा मुंडेंनी 'त्या' महिलेलाच समोर आणलं

Maharashtra Honey Trap Crime News : नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांसोबत शरीरसंबंध ठेवत त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप होत असलेल्या महिलेची पोलिसांमार्फत सध्या चौकशी केली जात आहे. आता याप्रकरणातील महिलेनं करुणा शर्मा-मुंडे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली.
Karuna Munde on Honey Trap.jpg
Karuna Munde on Honey Trap.jpgSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी :

  1. हनी ट्रॅप प्रकरणात नवे ट्विस्ट: एका महिलेने दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार केल्याचा आरोप केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

  2. करुणा मुंडे-शर्मा यांची पत्रकार परिषद: संबंधित महिलेच्या समर्थनार्थ करुणा मुंडे-शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

  3. महिलेवर उलट गुन्हे दाखल: तक्रार देण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी तिच्यावर आणि तिच्या मुलीवर खंडणीसंबंधी गुन्हे दाखल केल्याचा आरोप महिलेने केला.

Mumbai News : पावसाळी अधिवेशनानंतर महाराष्ट्राचं राजकारण हादरवणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणात दिवसेंदिवस अनेक नवनवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि काही माजी मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची चर्चा आहे. आता या हनी ट्रॅप प्रकरणात करुणा शर्मा-मुंडे (Karuna Sharma Munde) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप होत असलेल्या महिलेलाच समोर आणलं आहे.

करुणा शर्मा-मुंडे यांनी मंगळवारी (ता.22) मुंबईत पत्रकार परिषद घेत हनी ट्रॅप प्रकरणातील महिलेची बाजू मांडत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी या महिलेची बाजू मांडताना थेट महाराष्ट्रात सध्या महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप केला.

तसेच त्यांनी रक्षकच भक्षक झाले असल्याचा हल्लाबोल करत हनी ट्रॅप प्रकरणातील महिलेला उद्देशून माझ्यासोबत बसलेल्या या महिलेवर दोन पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार केल्याचा खळबळ उडवून देणारा आरोप केला आहे.

Karuna Munde on Honey Trap.jpg
Manikrao Kokate: इकडे कोकाटेंचा विरोधकांना कोर्टात खेचण्याचा इशारा; तिकडे राजीनाम्यासाठी 'दिल्ली'त हालचाली; 'मामा कनेक्शन' मोठा निर्णय घेणार?

याप्रकरणी त्या म्हणाल्या, या महिलेनं पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी तिच्यासह मुलीवरही गुन्हा दाखल केला. या महिलेच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नसल्याचंही करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांसोबत शरीरसंबंध ठेवत त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप होत असलेल्या महिलेची पोलिसांमार्फत सध्या चौकशी केली जात आहे. आता याप्रकरणातील महिलेनं करुणा शर्मा-मुंडे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली.

Karuna Munde on Honey Trap.jpg
Sandipan Bhumre News : दीडशे कोटींची जमीन गिफ्ट मिळालेल्या संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला आयकर विभागाचे बोलावणे!

यानंतर करुणा मुंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संबंधित महिलेनं गंभीर आरोप केले आहेत. या महिलेनं ठाण्यातील एक एसीपींनी आपल्यासोबत ओळख काढत माझा फोन नंबर घेतला. यानंतर त्यांनी माझ्यासोबत बोलायला सुरुवात केली.मला चहा घेण्यासाठी पोलिस स्टेशनलाही बोलावल्याचं सांगितलं.

त्याचवेळी संबंधित एसीपींना त्यांच्या बायकोचाही फोन आला आणि त्यांचा फोन आला म्हणून मी त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यावर तेथे त्यांची बायको नव्हती तर एसीपी दर्जाचा आणखी एक अधिकारी होता. तिथे या दोघांनी मला पाण्यातून गुंगीचं औषध देत माझ्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक दावा केला आहे.

Karuna Munde on Honey Trap.jpg
Shivsena Kiran Kale rape case : शिवसेना शहरप्रमुखाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक; ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळाच संशय

संबंधित महिला म्हणाली, यानंतर आपण याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून जबाबही घेण्यात आला. पीआय पदावरील महिला पोलीस अधिकाऱ्यानं मला शांत बसायला सांगत माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. माझ्यासोबत माझ्या मुलीवरही गुन्हा दाखल केल्याचंही म्हटलं. तसेच पोलिसांचं म्हणणं आहे की, आपण हनी ट्रॅप करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे,असंही महिलेनं पत्रकार परिषदेत सांगितलं.

पण यावेळी या महिलेनं संबंधित दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करतानाच त्यांनी घाटकोपरला टू बीएचके फ्लॅट घेतला असून याठिकाणी ते बांगलादेशी महिलांना घेऊन येतात. तिथे हे दोन्ही अधिकारी दारु पिऊन महिलांना वापरत असल्याचा दावाही महिलेनं केला आहे.

Karuna Munde on Honey Trap.jpg
Honey Trap Case : प्रफुल्ल लोढा नक्की कुणाच्या जवळचा? भाजप, मविआ दोन्हींच्या नेत्यांसोबत फोटो व्हायरल..

आपण तीन महिने महिला आयोगाकडे जात असून महिला आयोगानं यावर काहीच केलं नाही. मुख्यमंत्र्यांकडू नही महिलांच्या प्रश्नावर आम्हाला वेळ दिला जात नसल्याची तक्रार केली आहे. 10 ते 12 वेळा मी त्यांच्या पीएच्या माध्यमातून वेळ मागितला, मात्र त्यांनी वेळ दिला नसल्याचा आरोपही या महिलेनं केला आहे.

यावर करुणा शर्मा- मुंडे यांनी या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधित महिलेला तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

  1. प्रश्न: हनी ट्रॅप प्रकरणात नवे काय घडले?
    उत्तर: एका महिलेने दोन पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

  2. प्रश्न: करुणा मुंडे-शर्मा यांनी या प्रकरणात काय भूमिका घेतली?
    उत्तर: त्यांनी पत्रकार परिषद घेत महिलेची बाजू मांडली आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे न्याय मागितला.

  3. प्रश्न: पोलिसांनी पीडित महिलेवर काय कारवाई केली?
    उत्तर: पोलिसांनी तिच्यावर आणि मुलीवर खंडणीचा गुन्हा दाखल केला.

  4. प्रश्न: संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर आणखी कोणते आरोप झाले?
    उत्तर: त्यांच्यावर बांगलादेशी महिलांना फ्लॅटवर नेऊन गैरवर्तन केल्याचा आरोपही करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com