Ritabrata Banerjee: बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! ६० आमदारांच्या बंडखोर गटाला मान्यता, ऋतब्रता बॅनर्जी विरोधीपक्ष नेते

Ritabrata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न लागू झाला आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून ऋतब्रता बॅनर्जी हे बंगालचे एकनाथ शिंदे ठरले आहेत.
Mamata Banerjee_Ritabrata Banerjee
Mamata Banerjee_Ritabrata Banerjee
Published on
Updated on

Ritabrata Banerjee Became Leader of Opposition: पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न लागू झाला आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून ऋतब्रता बॅनर्जी हे बंगालचे एकनाथ शिंदे ठरले आहेत. त्यांनी तृणमूलच्या एकूण ८३ आमदारांपैकी ६० आमदार फोडून त्यांचा वेगळा गट स्थापन केला आहे. विशेष म्हणजे या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून ऋतब्रता बॅनर्जी यांची विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळं देशात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

बंडखोरीनंतर पत्रकारांशी बोलताना ऋतब्रता बॅनर्जी म्हणाले, "आम्ही विधानसभा अध्यक्षांपुढे असा दावा केला आहे की, आमच्यासोबत असलेल्या ६० आमदारांचा हा विधिमंडळ पक्ष आहे. या आमदारांनी तृणमूल काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक जिंकली असून त्यांची संख्या एकूण आमदारांच्या दोन-तृतीयांश इतकी आहे. त्यामुळं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी आमचा हा दावा मान्य केला आहे. त्यामुळे आता आम्ही एक-एक पाऊल टाकत, आणखी एक पाऊल पुढे टाकू इच्छित आहेत. मी यापूर्वीच स्पष्टपणे नमूद केलं आहे की, १८व्या पश्चिम बंगाल विधानसभेतील तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या 'मुख्य सल्लागार' म्हणून काम पाहण्यासाठी आम्ही ममता बॅनर्जी यांना पत्र लिहू"

ऋतब्रता बॅनर्जी पुढे म्हणाले की, "१८ व्या पश्चिम बंगाल विधानसभेचा विचार करता, अभिषेक बॅनर्जी यांचा या विधानसभेशी कोणताही संबंध नाही. संसद सदस्य या नात्याने, त्यांनी आम्हा आमदारांच्या बनावट सह्यांचं पत्र तयार केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळं या तक्रारीवर कार्यवाही करण्याचा सर्वस्वी अध्यक्षांचा अधिकार आहे. ते यावर काय निर्णय घेतील, हे मला माहित नाही. जर अशी एखादी घटना घडली असेल आणि ती सिद्ध झाली, तर अभिषेक बॅनर्जी यांची भारताच्या लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्याबाबत या विधानसभेचे अध्यक्ष लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहू शकतात"

दरम्यान, तृणमूल काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन ६० आमदारांचा वेगळा गट स्थापन केल्यानंतरही ऋतब्रता बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी याच आमच्या नेत्या असल्याचं म्हटलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर जो प्रकार घडला तोच प्रकार इथं दिसून येत आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतरही शरद पवार हेच आमचे नेते असल्याचं त्यांनी सुरुवातीला वारंवार सांगितलं होतं. म्हणजेच पक्षात फूट झाल्याचं ते दाखवू इच्छित नव्हते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com