Maharashtra Political News : गुप्त समझोता कळला अन् शिंदे-पवार बाहेर पडले! राष्ट्रवादीच्या नेत्यानं गुपित फोडलं

NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतर नेत्यांकडून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही नेत्यांकडून गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली जात आहे. त्यामध्ये आता उमेश पाटलांची भर पडली आहे.
Eknath Shinde, Ajit Pawar
Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama

Sangli Political News : शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार का बाहेर पडले याचं गुपित सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी उघड केले आहे. (Maharashtra Political News) त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच टार्गेट केले. पुत्र आणि पुत्री प्रेमामुळे हे दोन पक्ष फुटल्याचा दावा त्यांनी केला आहे.

रश्मी ठाकरे यांना आदित्य ठाकरेना (Aditya Thackeray) मुख्यमंत्री करण्याची इच्छा होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणूनच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव समोर आले. पण पुढचे अडीच वर्षांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मुख्यमंत्री करण्याचा गुप्त समझोता झाला होता. या गुपित गोष्टी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना समजल्यानंतरच दोन्ही पक्षात फूट पडली, असा दावा उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केला आहे. 

उमेश पाटील पुढे म्हणाले, अजित पवार हे तीन वेळा आमदार तर एकदा खासदार झालेत. आर. आर. पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, यांच्यासारखे जेष्ठ नेते देखील मुख्यमंत्री करण्यासारखे होते. तेही मुख्यमंत्री पदाला सक्षम होते. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्यांना ग्रामपंचायत सदस्य पदाचाही अनुभव नसलेले ते ठाकरे मुख्यमंत्रीपदी कसे चालले, असा सवाल पाटील यांनी केला. (Latest political News).

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीच्या पुढच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव आखण्यात आला होता. त्याची माहिती आणि भनक सुद्धा काँग्रेसला नव्हती. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराला याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळेच पक्ष फुटण्याचे हे महत्त्वाचं कारण आहे, असा दावा पाटील यांनी केला. (Latest Marathi News)

उमेश पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील आरोप केलेत. खासदार राऊत हे माध्यमांना खोटी माहिती देत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास कोणाचाही विरोध नव्हता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांनी पुत्र प्रेमापोटी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा घाट लावून धरला होता, असा आरोप उमेश पाटील यांनी केला.

Eknath Shinde, Ajit Pawar
P N Patil News : आमदार पी. एन. पाटील यांच्या मेंदूला दुखापत, युद्धपातळीवर उपचार सुरू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com