P N Patil News : आमदार पी. एन. पाटील यांच्या मेंदूला दुखापत, युद्धपातळीवर उपचार सुरू

P N Patil Admitted Hospital In Kolhapur : कोल्हापुरातील ऍस्टर आधार या रुग्णालयात पी एन पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत.
pn Patil
pn Patil sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur P N Patil News, 20 May : आमदार पी. एन. पाटील हे राहत्या घरी रविवारी ( 19 मे ) पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला मोठी दुखापत झाली आहे. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत. मात्र, कार्यकर्त्यांनी संयम राखावा कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. तसेच रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये, असे आवाहन आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. दरम्यान, हे वृत्त समजताचं सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

कोल्हापुरातील ऍस्टर आधार या रुग्णालयात पी. एन. पाटील ( P N Patil ) यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाय घसरून जमिनीवर पडल्याने त्यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्या मेंदूतून प्राथमिक दर्शनी रक्तस्त्राव झाल्याची माहिती आहे. मुंबईवरून न्यूरोसर्जन डॉक्टर सुहास बराले यांनी रविवारी कोल्हापुरात येऊन त्यांच्यावर उपचार केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून लवकरच यातून ते बाहेर पडतील," अशी माहिती डॉ. बराले यांनी दिली.

pn Patil
Sangli Lok Sabha 2024: सांगलीचा खासदार कोण? पैज लावणं दोघा मित्रांच्या अंगलट; पोलिसांनी उचललं मोठे पाऊल...

दरम्यान, रविवारी हे वृत्त करताच सोमवारी करवीर विधानसभा क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी ऍस्टर आधार रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली आहे. तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी देखील आमदार पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली आहे. "कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी," असे आवाहन आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांनी केले आहे.

( Ediyed By : Akshay Sabale )

pn Patil
Raju Shetty News : मतदानानंतर राजू शेट्टी पुन्हा एकदा मैदानात; थेट दिल्लीतील साखर आयुक्तांना लिहिले पत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com