New Delhi : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत विनेश फोगाट अंतिम सामन्यापर्यंत पोहचली होती. पण 100 किलो वजन अधिक भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे देशभरात तिच्याबद्दल भावनिक लाट पसरली होती. त्यावेळी तिने पुन्हा कुस्ती खेळणार नसल्याचे जाहीर केले होते. ती कुस्तीच्या मैदानावर दिसणार नसली तरी आता राजकीय मैदान गाजवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यापार्श्वभूमीवर विनेश फोगाटसह कुस्तीपटू बजरंग पुनिया हे दोघेही शुक्रवारी राजकारणात प्रवेश करणार आहेत. त्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाची निवड केली आहे.
दोन दिवसांपूर्वीच दोघांनी दिल्लीता काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. दिल्लीत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोघांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले जाणार आहे. या दोघांनाही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले जाणार आहे. त्यांचे मतदारसंघही ठरल्याची चर्चा आहे.
दोघांच्या प्रवेशानंतर काही तासांत काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली जाऊ शकते. दरम्यान, फोगाट आणि पुनियाच्या काँग्रेस प्रवेशावर भाजपने टीका केली आहे. हरियाणा भाजपचे नेते अनिल विज यांनी विनेश देशाची मुलगी होती आता तिला काँग्रेसची मुलगी बनायचे आहे, असे टोला लगावला आहे.
पहिलवानांच्या आंदोलनावरूनही वीज यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस पहिल्या दिवसापासून पहिलवानांच्या मागे होती. काँग्रेसच्या पाठिंबामुळेच त्यांचे आंदोलन सुरू होते. अन्यथा त्यावर निर्णय झाला असता, असे विज यांनी म्हटले आहे. काँग्रेस विनेशच्या प्रतिष्ठेचा फायदा उठवू पाहत असल्याची टीका खासदार मनोज तिवारी यांनी केली.
दरम्यान, विनेशला दादरी मतदारसंघातून तर पुनियाला बादलीमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. विनेशने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्याचा मोठा फायदा पक्षाला होऊ शकते. खाप पंचायत तसेच शेतकऱ्यांचा पाठिंबा विनेशला मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.