Mahua Moitra News : महुआ मोईत्रांच्या मागे आता ‘ईडी’ची पिडा; ‘हे’ प्रकरण येणार अंगलट

ED Summoned : ईडीने महुआ मोईत्रांना समन्स पाठवत 19 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.  
Mahua Moitra
Mahua MoitraSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्यासमोरील अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. पैसे घेऊन प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात आधीच त्यांची खासदारकी गेली आहे. त्यातच आता त्या सक्तवसुली संचालनालयाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. ईडीने त्यांना समन्स पाठवून 19 फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले आहे. (Mahua Moitra News)

फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अक्ट (फेमा) अंतर्गत दाखल प्रकरणात महुआ यांना समन्स बजावण्यात आले आहे. महुआ यांची खासदारकी लोकसभेच्या (Lok Sabha) एथिक्स कमिटीच्या शिफारशीनुसार रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सदस्यांसाठीच्या पोर्टलचे पासवर्ड व युझर आयडी इतरांना दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

Mahua Moitra
Lok Sabha Election 2024 : ममतांना झटका; मिमी चक्रवर्तींचा खासदारकीचा राजीनामा

या प्रकरणात महुआ यांची सीबीआयकडूनही (CBI) चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांनी सीबीआयच्या प्रश्नांना लेखी उत्तरेही पाठवल्याचे गुरुवारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी सीबीआयकडून महुआ यांचे पूर्वीचे मित्र जय देहाद्राई आणि उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडेही चौकशी करणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एथिक्स कमिटीने आपल्या अहवालात महुआ मोईत्रा यांची कायदेशीर चौकशी करण्याची शिफारसही केली आहे. त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे केली जावी, असेही म्हटले आहे. या प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यास महुआ तुरुंगात जाऊ शकतात.

निवडणूक लढवू शकतात का?

मागील वर्षी महुआ मोईत्रा यांची खासरकी रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता लोकसभा निवडणूक (Election) होणार असल्याने त्या उमेदवारी अर्ज भरू शकतात का, याबाबत उत्सुकता आहे. कोणत्याही न्यायालयाकडून त्यांना किमान दोन वर्षे शिक्षा होईपर्यंत त्या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे आगामी निवडणूक त्या लढवू शकतात.

R

Mahua Moitra
Lok Sabha Election 2024 : फारुख अब्दुलांचा ‘इंडिया’ला दे धक्का; निवडणुकीबाबत मोठी घोषणा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com