Lok Sabha Election 2024 : फारुख अब्दुलांचा ‘इंडिया’ला दे धक्का; निवडणुकीबाबत मोठी घोषणा...

Farooq Abdullah : इंडिया आघाडीमध्ये जागावाटपाबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत मोठं भाष्य करत अब्दुलांनी एकला चलोची भूमिका जाहीर केली आहे.
Farooq Abdullah
Farooq AbdullahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीला सातत्याने तडे जात आहेत. पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब, दिल्लीनंतर आता जम्मू-काश्मीरमध्येही तडा गेला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाशी आघाडी करणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. (Lok Sabha Election 2024)

फारुख अब्दुल्ला हे इंडिया आघाडीतील (India Alliance) महत्त्वाचे नेते मानले जात होते. त्यांच्यामुळे काँग्रेसला काश्मीरमधून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यानुसार जागावाटपाबाबत बोलणीही सुरू होती, पण त्यामध्ये विलंब होत असल्याने अब्दुला यांनी मागील महिन्यातच नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्याचा फटका आघाडीला बसला असून, अब्दुला यांनी एकलो चलोची भूमिका जाहीर केली आहे.

Farooq Abdullah
Congress News : काँग्रेसला धक्का; राहुल गांधींना इशारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांशी दोन आमदारांची हातमिळवणी

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अब्दुला यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी न करण्याची घोषणा केली. कोणत्या आघाडीमध्ये किंवा पक्षासोबत न जाता नॅशनल कॉन्फरन्स स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (NDA) सहभागी होण्याबाबतही सूचक संकेत दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अब्दुल्ला यांचा पक्ष एनडीएमध्ये काही वर्षांपूर्वी सहभागी झाला होता. जागावाटपाबाबत बोलताना मागील महिन्यात ते म्हणाले होते की, ‘जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरात लवकर निश्चित केला नाही तर काही विरोधी पक्ष स्वतंत्र आघाडी करून निवडणूक लढवतील,’ आता त्यांनीच इंडिया आघाडीला धक्का दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये नितीश कुमार यांनी एनडीएमध्ये सहभागी होत आघाडीला धक्का दिला आहे. त्याआधी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनीही काँग्रेसशी आघाडी न करण्याचा निर्णय घेतला, तर पंजाब, दिल्लीमध्ये आपही काँग्रेसशी (Congress) आघाडी करण्यास तयार नसल्याने ‘इंडिया’च्या प्रयत्नांना धक्के बसले आहेत.  

R 

Farooq Abdullah
Lok Sabha Election 2024 : रायबरेलीतून कुणाला उमेदवारी? सोनिया गांधींनी भावनिक पत्रातून दिले संकेत...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com