TMC MP Mahua Moitra News : तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या महुआ मोईत्रा यांच्या रद्द झालेल्या खासदारकीच्या याचिकेवर आज शुक्रवारी (15 डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. (Latest Marathi News)
महुआ मोईत्रा यांनी बुधवारी त्यांच्या याचिकेच्या सुनावणीसाठी तारीख मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांनी या प्रकरणी याचिकाकर्त्यांना आश्वासन दिले आहे की, सर्वोच्च न्यायालय त्याच्या केसची त्वरित यादी करण्याच्या विनंतीवर विचार करणार आहे. 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणी महुआ मोईत्रा यांची गेल्या शुक्रवारी संसद सदस्यपदावरुन गच्छंती केली होती.
महुआ मोइत्रा यांचे संसद सदस्य रद्द करण्यासाठी लोकसभेत प्रस्ताव आणण्यात आला, तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. लोकसभेच्या शिष्टाचार समितीच्या अहवालात महुआ मोईत्रा यांनी उद्योजक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि भेटवस्तू घेतल्याचे सांगण्यात आले, अशा ठपका ठेवून त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.
महुआ मोइत्रा यांनी आपल्या याचिकेत संसदेचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. शिष्टाचार समितीच्या निष्कर्षांवरील चर्चेदरम्यान त्यांना लोकसभेत स्वतःचा बचाव करण्याची परवानगी देण्यात आली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.