BJP News : 'मुख्यमंत्री संमेलना'नंतर भाजपच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल? ; महाराष्ट्राचं कुठं अडलं?

Changes in BJP's party organization : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा..
BJP News :
BJP News :Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आठवडाभर विविध दौऱ्यांमुळे धावपळ झाली. यामुळे आत केंद्रीय मंत्रिमंडळातच नाही, तर पक्ष संघटनेतही अनेक बदल आणि विस्तार होण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत उद्या भाजपचं मुख्यमंत्री संमेलन होणार आहे. या संमेलनानंतर भाजपमध्ये पक्षपातळीवर अनेक मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

BJP News :
Wrestlers Protest : कुस्तीपटूंचा पुन्हा सरकारला इशारा; '...तर आशियाई क्रिडा स्पर्धेत..'

नजीक येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यापूर्वी होणाऱ्या चार राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे मुख्यमंत्री संमेलन महत्त्वाचे मानले जात आहे. भाजपच्या मुख्यालयात होणाऱ्या या संमेलनाला भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, सचिव बी एल संतोष उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत संघटनात्म बदल, केंद्रीय योजनांचा विस्तार, लोकसभा निवडणुकीसाठी संपर्क मोहिम तसेच, काही महत्त्वाच्या धोरणांवर चर्चा आणि चिंतन होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्तारावर चर्चा होणार आहे.

BJP News :
Mrs. Mukhyamantri In Maharashtra : महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या मिसेस मुख्यमंत्री

मध्य प्रदेश-राजस्थानसाठी रणणीती -

मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्याच्या विधानसभा निवडणुका वर्षेअखेर होणार आहेत. या राज्यांच्या निवडणुका जिंकणे भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. वसुंधराराजेंच्या नाराजीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. तर काही अंशी गटबाजी निर्माण झाली आहे. वसुंधराराजे यांच्याशी चर्चा करून पुन्हा एकदा त्यांच्याकडे राजस्थान राज्याची धुरा सोपवली जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत वसुंधराराजे यांच्याशी चर्चा करण्यात आली होती.

BJP News :
Praful Patel News : प्रफुल्ल पटेल कसे बनले पवारांचे निकटवर्तीय ? ; NCPचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पद, सहा वेळा खासदार..

तर दुसरीकडे मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि प्रदेशाध्यक्ष व्हि डी शर्मा यांच्यात मतेभेद निर्माण झाले आहेत. यामुळे प्रदेश भाजप पदाधिकारी आणि राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com