Mallikarjun Kharge : काँग्रेसच्या नव्या स्टेअरिंग कमिटीची घोषणा, थरूरांना डावलेले : खर्गे अॅक्शन माेडमध्ये!

Mallikarjun Kharge : काँग्रेसची यंग ब्रिगेड निवडणुकींच्या लढाईसाठी सज्ज होणार!
Maliikarjun Kharge
Maliikarjun Kharge Sarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : नुकतीच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दोन उमेदवार रिंगणात होते खासदार मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार शशी थरूर अध्यक्षपदासाठी रिंगणात होते. यामध्ये शेवटी खर्गे यांनी बाजी मारली. आता अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खर्गे अॅक्शनमोड मध्ये आले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस वर्किंग कमिटीच्या जागी नवीन स्टेअरिंग कमिटीची घोषणा नवनिर्वाचित अध्यक्ष खर्गे यांनी केली आहे.

काँग्रेसच्या या नव्या स्टेअरिंग कमिटीत एकूण 47 सदस्यांचा समावेश आहे. या कमिटीमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि वायनाड मतदारसंघाचे खासदारराहुल गांधी व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांचाही समावेश आहे. मात्र यामध्ये विशेष बाब म्हणजे खर्गे यांच्याविरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले शशी थरूर यांचा या कमिटीमध्ये समावेश करण्यात आलेला नाहीये. यामुळे आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Maliikarjun Kharge
Mallikarjun Kharge : कॉंग्रेसनं कात टाकली ; नवी इनिंग सुरु, खर्गेंसमोर 'हे' मोठं आव्हान

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेल्या उमेदवाराचीच आता नवीन स्टेअरिंग कमिटीची निवड न झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे आता शशी थरूर यांना काँग्रेसमध्ये डावललं जातंय का? अशी चर्चा होत आहे. खर्गे हे गांधी परिवाराच्या जवळचे समजले जातात, तर थरूर हे स्वतंत्र बाण्याचे नेते अशी त्यांची ओळख आहे. यामुळेच शशी थरूरांना डावललं का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

Maliikarjun Kharge
मल्लिकार्जुन खर्गे अॅक्शन मोडवर; अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच मोठी घोषणा

दरम्यान आता काँग्रेसची काँग्रेस वर्किंग कमिटीच्या जागी नवीन स्टेअरिंग कमिटी आसणार आहे. यामध्य़े एकूण ४७ सदस्यांमध्ये समावेश आहे. या कमिटीत प्राधान्याने तरूण नेत्यांना संधी दिली गेली आहे. यामुळे पुढील काळात काँग्रेसची यंग ब्रिगेड निवडणुकींच्या लढाईसाठी सज्ज होणार, याची चिन्हे दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com