Mallikarjun Kharge Letter to PM Modi : खर्गेंनी मोदींना लिहिलं पत्र ; 'या' बाबत लवकरच निर्णय..

Congress Demanding Caste Based Census of 2021 Across Country : काँग्रेसने यापूवी अनेक वेळा ही मागणी केली आहे.
Mallikarjun Kharge - Narendra Modi
Mallikarjun Kharge - Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mallikarjun Kharge Letter to PM Modi : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

हे पत्र काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी टि्वट केलं आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी जातीनिहाय जनगणना लवकरच करावी, अशी मागणी या पत्रात केली आहे.

Mallikarjun Kharge - Narendra Modi
Maharashtra Bhushan Award : बारा श्रीसेवकांच्या मृत्युस अमित शाह हेच कारणीभूत ; लवकरच जायचं होतं म्हणून दुपारी..

जातीच्या आधारावर जातीगणना केल्यामुळे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मजबूत होण्यास मदत होईल, असे खर्गे यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

काँग्रेस पक्ष आणि नेत्यांकडून मी पुन्हा एकदा आपल्याला जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यासाठी हे पत्र लिहित आहे, असे त्यांनी खर्गे यांनी म्हटलं आहे.

Mallikarjun Kharge - Narendra Modi
Supreme Court News: राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होणार ? आज सुनावणी

माझे सहकाऱ्यांनी राज्यसभा आणि लोकसभेत याबाबतची मागणी केली आहे. अन्य विरोधी पक्षांनीही ही मागणी केली आहे, असे खर्गे यांनी नमूद केले आहे.

काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी त्यांचे पत्र टि्वट केलं आहे. जेवढी लोकसंख्या आहे, त्या तुलनेत त्यांना अधिकार , सुविधा मिळाल्या पाहिजे. काँग्रेसने यापूवी अनेक वेळा ही मागणी केली आहे.

Mallikarjun Kharge - Narendra Modi
BS Yediyurappa News : शेट्टार पु्न्हा BJP मध्ये आले तर स्वागतच, पण..; येदियुरप्पा म्हणाले..

बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी केली आहे. दोन टप्यात ही जनगणना होणार असल्याचे नीतीश कुमार यांनी सांगितले आहे. पहिला टप्पा संपला असून दुसरा टप्पा सुरु झाला आहे. त्यासाठी जातींना वेगळे वेगळे कोड देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com