TMC merger with Congress : ममता बॅनर्जींचे काँग्रेसमध्ये कमबॅक होणार? तृणमूलच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी राजकारणात नवा ट्विस्ट

Congress TMC alliance : ममता बॅनर्जी काँग्रेसमध्ये परतणार का? तृणमूल काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांमुळे राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

ममता बॅनर्जीचा पक्ष तृणमूल पुन्हा काँग्रेसमध्ये विलिन होणार का, असा प्रश्न सध्या राष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात संभाव्य राजकीय समीकरणांबाबत विविध चर्चा सुरू असून, त्यातून अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमधील बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर या चर्चांना अधिक वेग मिळाला आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या हायकमांडने तृणमूल काँग्रेससोबत नव्याने संवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही वृत्तांनुसार तृणमूलचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्तावही चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Mamata Banerjee
AI Usage Rules Supreme Court : AI च्या वापरावर निर्बंध येणार का? सुप्रीम कोर्टानं दिले महत्वाचे निर्देश

दरम्यान, दिल्लीमध्ये होणाऱ्या इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीसाठी ममता बॅनर्जी राजधानीत दाखल होणार असून, निवडणुकीनंतर प्रथमच त्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत एकाच मंचावर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत होणाऱ्या चर्चांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेससमोर अनेक राजकीय आव्हाने उभी ठाकल्याचे चित्र आहे. सत्तेपासून दूर गेल्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम झाल्याची चर्चा सुरू आहे. काही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढल्याचेही बोलले जात आहे. पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वाविषयीच्या नाराजीचे स्वर आता अधिक स्पष्टपणे समोर येत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Mamata Banerjee
BMC News: जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; BMC अधिकारी महेश पाटील निलंबित

तृणमूलमधील काही लोकप्रतिनिधी आणि नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे राजकीय घडामोडींना आणखी रंग चढला आहे. आगामी काळात विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होते आणि ममता बॅनर्जी यांची भूमिका काय राहते, याकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com