Mamata Banerjee News : ‘ऑक्सफर्ड’मध्ये ममतांविरोधात आंदोलन; विद्यार्थी तुटून पडले, दीदीही भिडल्या...

Student demonstrations​ West Bengal politics​ : मुख्यमंत्र्यांनीही सडेतोड उत्तरे देत आंदोलकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांकडून अचानक घोषणाबाजी सुरू झाल्याने सुरूवातीला ममता बॅनर्जीही गोंधळून गेल्या.
Mamata Banerjee in London
Mamata Banerjee in LondonSarkarnama
Published on
Updated on

Mamata Banerjee Politics : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गुरूवारी लंडनमध्ये होत्या. ऑक्सफर्ड विद्यापीठातील केलॉग कॉलेजमध्ये विद्यार्थी, प्राध्यापकांशी त्यांनी संवाद साधला. पण त्या बोलत असताना अचानक हातात फलक घेऊन काही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. बंगालमधील हिंसा, बलात्कार प्रकरण, घोटाळा आदी मुद्यांवर प्रश्नांचा भडिमार करत ममतादीदींना घेरण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ निर्माण झाला.

मुख्यमंत्र्यांनीही सडेतोड उत्तरे देत आंदोलकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांकडून अचानक घोषणाबाजी सुरू झाल्याने सुरूवातीला ममता बॅनर्जीही गोंधळून गेल्या. पण त्यांनी अत्यंत संयम दाखवत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराचे इतरांकडून स्वागत करण्यात आले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीही यावेळी उपस्थित होते.

Mamata Banerjee in London
Arvind Kejriwal: कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर दिल्ली पोलिसांची केजरीवालांच्या विरोधात तक्रार

आंदोलकांना उत्तर देताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी स्वत:चा जखमी अवस्थेतील डोक्याला पट्ट्या बांधलेला एक फोटोही दाखवला. तुम्ही माझे स्वागत करत आहोत, त्याबद्दल आभार. मी तुम्हाला मिठाई देईन. माझा अपमान करून तुमच्या संस्थेला अपमानित करू नका. मी देशाची प्रतिनिधी म्हणून इथे आले आहे, असे त्या म्हणाल्या. नंतर उपस्थितांनी आंदोलकांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी दीदी रॉयल बंगाल टायगरसारखी चालते, असेही विधान यावेळी केले. ममतांनी नंतर कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले भाषण पूर्ण केले. त्या उद्योग आणि व्यापारविषयक बैठकांसाठी लंडनला गेल्या होत्या. पण विद्यार्थ्यांसोबतचा त्यांचा संवाद सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या संवादादरम्यान त्यांनी सर्वसमावेशक विकासावर भऱ देताना समाजातील फूटीचा त्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला.

Mamata Banerjee in London
MPs and MLAs salary : आमदार-खासदारांची कमाई वाढली, जनता बेहाल! हा रिपोर्ट तुमची स्थिती सांगतोय...

स्वामी विवेकानंद यांचा विचारांचा आधार घेत ममता म्हणाल्या, स्वामी विवेकानंद हे एकतेत आपली ताकद आहे, समाजातील फूट आपल्याला पतनाकडे घेऊन जाते, असे मानायचे. मी जेव्हा खुर्चीवर असते, त्यावेळी समाजामध्ये फूट पडू देऊ सकत नाही. मला दुर्बल घटक आणि गरिबांचा विकास करायचा आहे. सर्व जाती-धर्म, पंथांतील लोकांसोबत मिळून काम करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com