Mamata Banerjee News : ममतांच्या दोन खासदारांचे बंड; लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बसणार धक्का...

Sandeshkhali Case : पश्चिम बंगालमध्ये सध्या संदेशखाली प्रकरणावर राजकारण तापलं असून, भाजपने ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Shishir Adhikari, Dibyendu Adhikari, Mamata Banerjee
Shishir Adhikari, Dibyendu Adhikari, Mamata BanerjeeSarkarnama

West Bengal Political News : पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणावरून मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. आता त्यांच्याच तृणमूल काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांनी उघडपणे सरकारच्या भूमिकेवरच नाराजी व्यक्त केली आहे, तर राज्यपालांच्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक केल्याने चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Mamata Banerjee News)

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) उत्तर 24 परगना जिल्ह्यातील संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी तृणमूलच्या एका नेत्याला पोलिसांनी अटकही केली आहे. भाजपने (BJP) ममता सरकारविरोधात रान उठवले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

Shishir Adhikari, Dibyendu Adhikari, Mamata Banerjee
Rajya Sabha Election 2024 : भाजपने लोकसभेआधी वाढवलं विरोधकांचं टेन्शन; 15 जागांसाठी होणार निवडणूक

राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी संदेशखालीमध्ये जाऊन तेथील महिलांची विचारपूस केली. तसेच त्यांच्यासाठी राजभवनचे दरवाजे सतत उघडे राहतील, असा भरवसाही दिला आहे. या भूमिकेचे तृणमूलच्या दोन खासदारांनी समर्थन केले आहे. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे वडील खासदार शिशिर अधिकारी आणि खासदार बंधू दिब्येंदू यांनी उघडपणे सरकारविरोधात भूमिका घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोघेही सध्या तृणमूलचे खासदार आहेत. दोघांनीही राज्यपालांचे कौतुक केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते सरकारविरोधात सक्रिय झाल्याने तृणमूलची चिंता वाढली आहे. टीएमसीचे नेते शांतनू सेन यांनी या दोघांना गद्दार म्हटले आहे. ते काय विचार करतात, याने काहीच फरक पडत नाही. आधी ते भाजपमध्ये दाखल झालेत, की अजून टीएमसीमध्येच आहेत हे स्पष्ट करावे, असा आव्हान सेन यांनी दिले.

विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पिता-पुत्रांनी सातत्याने सरकारविरोधात आवाज उठवला आहे. त्यामुळे ते आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवतील, अशी शक्यता आहे. ते मागील दोन-तीन वर्षांपासून तृणमूलपासून दुरावले आहेत.

काय आहे प्रकरण?

संदेशखालीमधील अनेक महिलांनी तृणमूलचे स्थानिक नेते शाहजहाँ शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपणे आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. रात्रीच्या वेळी ते घरी मुलींना घेऊन जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. महिलांकडून तृणमूलच्या नेत्यांविरोधात आंदोलन केले जात असून, त्याला भाजपचीही साथ मिळत आहे. आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. मागील महिन्यात शेख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. त्यावेळी स्थानिकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. तेव्हापासून शेख फरार आहेत.

R

Shishir Adhikari, Dibyendu Adhikari, Mamata Banerjee
Bihar Political News : विधानसभा उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; बिहारमध्ये पुन्हा उलथापालथ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com