ममता बॅनर्जी हाजिर हो ; राष्ट्रगीत अवमानप्रकरणी न्यायालयाकडून समन्स

ममता बॅनर्जी यांनी बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. 'जन गण मन अधिनायक जय है', असं ते बसून म्हणाल्या.
Mamata Banerjee
Mamata Banerjeesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या गेल्या डिसेंबरमध्ये मुंबईच्या (Mumbai) दौऱ्यावर होत्या. या दरम्यान एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना राष्ट्रगीताचा सन्मान राखण्याचा विसर पडल्याचा आरोप भाजपने केला आहे. याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना शिवडी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे.

भाजपचे नेते विवेकानंद गुप्ता यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. ममता बॅनर्जी यांनी 'सिव्हील सोसायटी'च्या भेटीत संवाद साधत असताना त्यांच्या राष्ट्रगीताच्या काही ओळी खुर्चीवर बसून म्हटल्या. त्याशिवाय त्यांनी पूर्णपणे राष्ट्रगीताच्या ओळी म्हटल्या नाहीत असा आरोप गुप्ता यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांची ही कृती राष्ट्रगीताचा अपमान करणारी असल्याचे भाजपने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांना 2 मार्च 2022 रोजी हजर राहण्याचे आदेश शिवडी न्यायालयानं बुधवारी दिले आहेत. ममता बॅनर्जी यांनी बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. 'जन गण मन अधिनायक जय है', असं ते बसून म्हणाल्या. त्यानंतर ते बोलता बोलता जागेवरुन उठल्या. यावेळी त्या राष्ट्रगीच्या उर्वरित ओळी बोलू लागल्या. "भारतभाग्यविधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग", इथपर्यंतच त्या राष्ट्रगीत म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी 'जय महाराष्ट्र, जय बंगाल, जय भारत', अशी घोषणा केली.

Mamata Banerjee
योगींमुळे २६ दिवस कारागृहात गेलेल्या पूजा शुक्ला 'सायकल'वर स्वार

गुप्ता यांनी मेलद्वारे थेट मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार केली आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला आहे. राष्ट्रगीताची सुरुवात त्यांनी खाली बसूनच केली. त्या राष्ट्रगीत गात असताना मध्येच थांबल्या, असा आरोप या तक्रारीत केला आहे.

Mamata Banerjee
निवडणुकी आधीच कॉग्रेसची माघार ; अखिलेश यांच्यासाठी शब्द पाळला!

''ममता बॅनर्जी यांनी जाणूनबुजून राष्ट्रगीताचा अपमान केला आहे. राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. ममता बॅनर्जी यादेखील त्याच राज्यातील आहेत. ममतांनी केवळ राज्यातील नागरिकांचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचा अपमान केला आहे. त्यामुळे मी मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती करतो की, त्यांच्याविरोधात तात्काळ एफआयआर नोंदवून त्याची चौकशी करावी,'' असे गुप्ता यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com