Mamata Banerjee : ...म्हणून I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीस ममता बॅनर्जी गैरहजर राहणार!

I.N.D.I.A Alliance Meeting : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी 1 जून रोजी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjee News Sarkarnama

Mamata Banerjee and I.N.D.I.A Alliance Meeting : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीच म्हणजेच 1 जून रोजीच विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. मात्र या बैठकीस तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता स्वत: ममता बॅनर्जींनी या शक्यतांवर पूर्णविराम लावला आहे.

ममता बॅनर्जींनी(Mamata Banerjee ) एका सभेत बोलताना म्हटले की, इंडिया आघाडीने 1 जून रोजी बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. तेव्हाच त्यांनी म्हटले होते की, त्या या बैठकीत सहभागी होऊ शकणार नाहीत. याचे कारण, देताना त्या म्हणल्या काही आमच्याकडे सुद्धा काही जागांवर निवडणूक होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाय एकीकडे मी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागांचा आणि रिलीफ सेंटरचा दौरा करत आहे. अशावेळी मी बैठकीस कसं काय हजर राहू शकेल? तसेच, त्यांनी त्यांची प्राथमिकता लोकांना दिलासा देण्याची असल्याचेही सांगितले आहे.

याआधी सुत्रांच्या हवाल्याने माहिती मिळत होती की, तृणमूल काँग्रेस 1 जून रोजी इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता नाही. याचे कारण या बैठकीच्या दिवशी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. मात्र आता ममता बॅनर्जींच्या वक्तव्याने यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखेच आहे. मीडिया रिपोर्टनुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) यांनी 1 जून रोजी दुपारी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

1 जून रोजी पश्चिम बंगालमधील नऊ मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये कोलकातामधील दोन जागा कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर-पश्चिम यांचा समावेश आहे. या जागा तृणमूल काँग्रेससाठी(TMC) अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या दिवशी बंगालमधील अनेक महत्त्वपूर्ण जागांवर मतदान होणार आहे.ज्यामध्ये जादवपूर, दम दम, बारासात, जयनगर, मथुरापुर, डायमंर हार्बर, कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर-पश्चिम या जागांचा समावेश आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com