Manikrao Thakare : माणिकराव ठाकरे आणि अशोक चव्हाणांच्या अहवालानंतर ठरणार तेलंगणाचे मुख्यमंत्री

Telangana CM : तेलंगणामध्ये काँग्रेसने ६४ जागा मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे.
Manikrao Thakare, Ashok Chavan
Manikrao Thakare, Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Assembly Election 2023 : तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर काँग्रेसला पहिल्यांदाच सत्ता मिळाली आहे. या विजयात दोन मराठमोळ्या नेत्यांचाही मोठा हातभार आहे. तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री यांच्यावर निवडणुकीची मोठी जबाबदारी टाकण्यात आली होती. आता मुख्यमंत्र्यांची निवडही त्यांच्या अहवालावर अवलंबून असणार आहे. पक्षाच्या संसदीय रणनीती गटाच्या बैठकीत आज अहवाल सादर केला जाणार आहे.

तेलंगणामध्ये काँग्रेसने ६४ जागा मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. सत्ताधारी बीआरएसला केवळ ३९ जागांवर समाधान मानावे लागले, तर केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला आठ जागा मिळाल्या. पाच राज्यांच्या निवडणुकीत केवळ तेलंगणाने काँग्रेसला हात दिला. त्यामुळे हा विजय काँग्रेससाठी संजीवनी ठरणार आहे. (Telangana Assembly Election Result News)

Manikrao Thakare, Ashok Chavan
Mizoram Election News : मिझोरममध्ये भाजपला दोनच जागा; मोदींनी का रद्द केला प्रचार दौरा?

निवडणुकीआधी पक्षाने माणिकराव ठाकरे यांच्यावर प्रभारी म्हणून, तर अशोक चव्हाण यांच्यावर विशेष निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली होती. या दोघांनी राजकारणातील अनुभवाच्या जोरावर तेलंगणात पक्षाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. आता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी या दोघांचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवनियुक्त सर्व आमदारांची आज तेलंगणामध्ये बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री निवडीचे सर्व अधिकार पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे देण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. या बैठकीत झालेला निर्णय, वरिष्ठ नेत्यांशी झालेली चर्चा, राज्यातील प्रमुख नेते, राजकीय स्थितीबाबतचा अहवाल ठाकरे व चव्हाण यांच्याकडून आज संसदीय रणनीती गटाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. ही बैठक सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी होत आहे.

Manikrao Thakare, Ashok Chavan
Raghav Chadha: राघव चड्ढांना दिलासा; राज्यसभेतील निलंबन 115 दिवसांनंतर मागे

दरम्यान, तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी हे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. पक्षाला राज्यात सत्ता मिळवून देण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. त्यामुळे बीआरएसची दहा वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात पक्षाला यश मिळाल्याचे मानले जात आहे. कोडगंल मतदारसंघातून रेवंथ रेड्डींना एक लाख सात हजार ४२९ मते मिळाले आहेत. त्यांनी बीआरएसच्या उमेदवाराचा ३२ हजार ५३२ मतांनी पराभव केला आहे.  

(Edited By - Rajanand More)

Manikrao Thakare, Ashok Chavan
Mizoram Assembly Elections Results 2023 : पहिल्या तासातच 'झेडपीएम'ची बहुमतापर्यंत मजल; मिझोरममध्ये सत्ताविरोधी कल ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com