Raghav Chadha
Raghav ChadhaSarkarnama

Raghav Chadha: राघव चड्ढांना दिलासा; राज्यसभेतील निलंबन 115 दिवसांनंतर मागे

Aam Aadmi Party : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 11 ऑगस्टला चड्डा यांना राज्यसभेच्या सदस्य पदावरून निलंबित करण्यात आले होते.
Published on

Delhi News: आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांना पुन्हा एकदा राज्यसभेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सोमवारी याबाबतचा निर्णय घेतला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 11 ऑगस्टला चड्डा यांना अनिश्चित काळासाठी राज्यसभेच्या सदस्य पदावरून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर राघव यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.

राघव चड्ढा यांनी पाच खासदारांच्या संमतीशिवाय दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्या खासदारांचा उल्लेख केला होता. हा प्रस्ताव आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी मांडला होता. त्या प्रकरणावरून चौकशी मागणी केल्यानंतर राज्यसभेचे सभापती धनखड यांनी राघव चड्ढा यांना निलंबित केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raghav Chadha
PM Narendra Modi : 'आता संसदेत राग काढू नका’, पंतप्रधान मोदींचा विरोधकांना सल्ला

विशेषाधिकर समितीचा अहवाल येईपर्यंत अनिश्चित काळासाठी सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यावर राघव चड्ढा यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयाने चड्ढा यांना सभापतींची बिनशर्त माफी मागण्याचे निर्देश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राघव चड्ढा यांचे सदस्यत्व बहाल करण्यासंदर्भात संसदेत विशेषाधिकार समितीने बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर चड्ढा म्हणाले, 115 दिवसांसाठी माझे सदस्यत्व रद्द झाले.

त्यामुळे मला या काळात जनतेचे प्रश्न सभागृहात मांडता आले नसल्याचे मतही चढ्डा यांनी व्यक्त केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळेच माझ्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली. त्यामुळे मी राज्यसभेचे सभापती आणि सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) आभारी असल्याची प्रतिक्रिया चड्ढा यांनी दिली.

(Edited by- Ganesh Thombare)

Raghav Chadha
Assembly Election Result : सुपडा साफ होऊनही काँग्रेसला ‘स्ट्राइक रेट’ने दाखवला आशेचा किरण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com