
Manipur latest crime news : मणिपूर पोलिसांनी तीन तरूणांना उत्तराखंडमधून अटक केली आहे. या तिघांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा बनून मणिपूरच्या अनेक आमदारांना फोन केल्याचा आरोप आहे. या आरोपींनी आमदारांकडे मुख्यमंत्री बनवण्याच्या बदल्यात चार कोटी रुपयांची मागणी केली होती. मणिपूरमध्ये मागील महिन्यात बीरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाच राजीनामा दिला होता, ज्यानंतर राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाले आहे.
एन बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील अनेक आमदारांना फोन आले, ज्यात फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांचा मुलगा जय शाह अशी सांगितली आणि म्हटले की जर त्यांनी चार कोटी रुपये दिले तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं जावू शकतं. जेव्हा पोलिसांना याबाबत तक्रार मिळाली तेव्हा याचा तपास सुरू झाला.
पोलिसांनी(Police) सांगितले की, तपासानंतर तीन आरोपींना उत्तराखंड येथून अटक केली गेली आहे आणि तिघांनाही इंफाळला आणले गेले. आरोपींची ओळख उत्तर प्रदेशातील निधौरी कलां निवासी उवैश अहमद, दिल्लीचे गाजीपूर निवासी गौरव नाथ आणि प्रियांशू पत अशी समोर आली आहे.
मणिपूरमधील(Manipur) दोन प्रतिबंधित दहशतवादी संघटनांशी संबधित दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी पोलिसांनी सांगितले की, बंदी घातलेल्या कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी या संघटनेच्या तात्पुरत्या छावणीतून सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना इंफाळ पश्चिमेकडील तेरा उरक भागातून अटक करण्यात आली.
संशयितांकडून शस्त्रे आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. तर इंफाळ पूर्वेतील खुराई चिंगाबाम भागातून पोलिसांनी या संघटनेशी संबंधित आणखी दोन जणांना अटक केली आहे. तर या शिवाय मणिपूर पोलिसांनी बंदी घातलेल्य प्रीपेक संघटनेशी संबंधित एका संशयितालाही अटक केली आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.