Mann Ki Baat : 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींनी ढवळून काढले 2024 वर्ष; संविधान दिन, ऑलिम्पिक ते महाकुंभ...

PM Narendra Modi In Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी 'मन की बात'वर या कार्यक्रमातून संवाद साधला. आजचा हा कार्यक्रम या वर्षातील शेवटचा आणि 117 वा भाग होता. या कार्यक्रमात त्यांनी संविधान दिन आणि महाकुंभ तसंच बस्तर ऑलिम्पिकवर भाष्य केलं.
PM Narendra Modi In Mann Ki Baat
PM Narendra Modi In Mann Ki BaatSarkarnama
Published on
Updated on

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज देशातील जनतेशी 'मन की बात'वर या कार्यक्रमातून संवाद साधला. आजचा हा कार्यक्रम या वर्षातील शेवटचा आणि 117 वा भाग होता. या कार्यक्रमात त्यांनी संविधान दिन आणि महाकुंभ तसंच बस्तर ऑलिम्पिकवर भाष्य केलं.

यावेळी त्यांनी सरकारकडून वर्षभर राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवर भाष्य केलं. संविधान दिनापासून बोलायला त्यांनी सुरुवात केली. संविधानाच्या वारशाशी नागरिकांना जोडण्यासाठी constition75.com वेबसाइटही तयार केली असून याद्वारे संविधानाची प्रस्तावना वाचून तुमचा व्हिडिओ अपलोड करू शकता, असं त्यांनी सांगितलं.

तसंच यावेळी त्यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या येथे महाकुंभमध्ये (Mahakumbh) पहिल्यांदाच एआय चॅटबॉटचा वापर केला जाणार असल्याचं सांगितलं. एआयद्वारे महाकुंभशी संबंधित प्रत्येक अपडेट 11 भाषांमध्ये मिळेल. तंसंच कोणीही आपणाला हवी ती माहिती एआयद्वारे मिळवू शकतो असं त्यांनी सांगितलं.

पीएम मोदींनी (Narendra Modi) त्यांच्या भाषणात मुलांच्या ॲनिमेशन मालिका KTB चाही उल्लेख केला. पीएम म्हणाले की "क्रिश, त्रिश आणि बाल्टिबॉय. तुम्हाला माहित असेल की ही मुलांची आवडती ॲनिमेशन मालिका आहे आणि तिचे नाव KTB - भारत हैं हम आहे. हे तिघे आपल्याला भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्या नायक-नायिकांबद्दल सांगतात ज्यांची फारशी चर्चा होत नाही."

PM Narendra Modi In Mann Ki Baat
Chandrant Patil : प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्या वादात चंद्रकांत पाटलांची मध्यस्ती, म्हणाले, "दोनवेळा फोन केला..."

तसंच बस्तर ऑलिम्पिकवर (Olympik) बोलताना ते म्हणाले, बस्तरमध्ये एक अनोखं ऑलिम्पिक सुरू झालं आहे. प्रथमच बस्तर ऑलिम्पिक आयोजित केल्याने बस्तरमध्ये एका नवीन क्रांतीचा जन्म होत असून या ऑलिम्पिकचे स्वप्न पूर्ण झाले ही आनंदाची बाब आहे.

PM Narendra Modi In Mann Ki Baat
Anjali Damania : संतोष देशमुख हत्येप्रकरणी केलेलं 'ते' वक्तव्य अंजली दमानियांना भोवणार? बीड पोलिसांनी धाडली नोटीस

शिवाय तुम्हाला हे जाणून आनंद होईल हे ऑलिम्पिक अशा ठिकाणी घेण्यात आलं जे एकेकाळी माओवादी हिंसाचाराचे साक्षीदार होते, असं म्हणत त्यांनी वर्षभरातील उपक्रमांचा आजच्या मन की बात या कार्यक्रमात आढावा घेतला. शिवाय चित्रपट उद्योगातील ख्यातनाम व्यक्तींबद्दलही ते या कार्यक्रमात भरभरून बोलले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com